Bigg Boss 18 
मनोरंजन बातम्या

नवऱ्यानेच केली Bigg Bossकडे बायकोला घराबाहेर काढण्याची मागणी, हृतिक रोशनच्या लाइफ कोच कपलचं नेमकं चाललंय तरी काय?

Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. आता मात्र हृतिक रोशनच्या लाइफ कोच कपलमध्येच वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'मध्ये (Bigg Boss 18) नेहमी एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून घरात भांडणे पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan ) लाइफ कोच कपल देखील यावेळी बिग बॉसच्या घरात आहे. म्हणजेच अरफीन खान (Arfeen Khan) आणि सारा अरफीन खान (Sara Khan) हे दोघ बिग बॉसच्या घरात गेम खेळताना पाहायला मिळत आहेत. अरफीन 'बिग बॉस 18'चा पहिला कॅप्टन होता. त्याला 'टाइम गॉड'ची पावर बिग बॉसने दिली होती.

आता बिग बॉसच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरफीन जेलमध्ये दिसत आहे. बिग बॉसने या कपलला मोठा धक्का दिला आहे. बिग बॉसने अरफीन जेल मध्ये टाकले तर त्याच्या बायकोला म्हणजे सारा अरफीन खानला 24 तासांत घरातून बाहेर करणार असल्याचे सांगितले. नवऱ्याच्या चुकीची शिक्षा बायकोला मिळत आहे. तसेच बिग बॉसने अरफीनचा एक ऑडियो क्लिप घरात ऐकवला त्यात अरफीन बोलत होता की, साराला "बिग बॉसच्या घरात नाही राहिलं पाहिजे." म्हणजे नवऱ्याने बायकोला घराबाहेर काढण्याची मागणी बिग बॉसकडे केली. त्यामुळे "आपकी बात सर आंखों पर" म्हणतं, साराला 24 तासांत घराबाहेर जाण्याचा आदेश देतात. शेवटी बिग बॉस म्हणतात की, "अतीत तमचा मारेगा,मार दिया"

या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी विवियन डीसेना, रजत दलाला, मुस्कान बामणे, अविनाश मिश्रा, नायरा बनर्जी या सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणून हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT