Nikki Tamboli- Arbaz Patel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli- Arbaz Patel: 'संपले जरी सारे तरी...' बिग बॉसच्या घरात निक्की- अरबाजचा खेळ सुरूच

Bigg Boss Marathi Nikki- Arbaz Meetup : बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ अंतिम टप्प्यात आहे. आता बिग बॉसच्या घरात काय होणार आहे. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. अलीकडेच बिग बॉसच्या घरातील टॉप ६ स्पर्धक निश्चित झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून बिग बॉस प्रेमींना सुखद धक्का मिळाला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात शेवटच्या दिवशी स्पर्धकांना खास सरप्राईज मिळणार आहे. नुकतंच रिलीज झालेल्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरात होणार रियुनियन अशी घोषणा होते. सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात परत दिसत आहेत. दरम्यान अरबाज घरात एन्ट्री करत आहे. अरबाजने एन्ट्री करत निक्कीला घट्ट मिठ्ठी मारली आणि तिला उचलून घेतलं आहे. नतंर दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात शेवटच्या दिवशी सहभागी झालेल्या जुन्या स्पर्धकांचं रियुनियन होणार आहे. यामध्ये अरबाज आणि निक्कीची पुन्हा भेट झाली आहे. अलिकडेच आठव्या आठवड्यात अरबाजचं घरातून एलिमेशन झालं होतं. अरबाज गेल्यानंतर निक्क खूपच भावूक झाली होती. रडत रडत निक्कीने बिग बॉसला अरबाजला नको जाण्याची विनंती केली होती. यानंतर बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक टास्क पार पडला यामध्ये निक्की आईने अरबाजविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. दरम्यान निक्की आणि अरबाजच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fire Breaking: मोठी दुर्घटना! प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Jio Recharge: खुशखबर 200 रुपयांत मिळणार 30 जीबी टेडा अन् बऱ्याच सुविधा, लगेचच वाचा प्लान

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

IND vs NZ series 2026: 40 दिवस आणि 12 सामने; पाहा कसा असणार टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा

ओले केस टॉवेलने गुंडाळणे योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT