Anushka Sharma Puts Allegation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma And Karan Johar News: करण जोहर विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करणार होती, पण..., अनुष्का शर्माने सांगितली मनातील सल

Anushka Sharma Puts Allegation: गेल्या काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ या शो मधील तिचं एक जुनं विधान चर्चेत आलं आहे.

Chetan Bodke

Anushka Sharma Shocks Fans Threatens: ‘बॅंड बाजा बरात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या अनुष्काने मित्र करण जोहरवर काही गंभीर आरोप लावले आहेत. अनुष्काने करण जोहर निर्मित ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ या दोन चित्रपटात काम केले आहे. सोबतच करण जोहरचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये ती प्रमुख गेस्ट म्हणून आली होती. आता अशातच त्या शो मधील एक तिचं जुनं विधान चर्चेत आलं आहे. त्या मध्ये ती करण विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करायचा आहे, असं म्हणते.

अनुष्का नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनुष्काने करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये तिने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर त्या शोमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या शोमध्ये येताच अनुष्काने करणच्या काही धक्कादायक गोष्टी सांगून त्याचे धाबे दणाणून टाकले आहे. अनुष्काने सांगितलेल्या गोष्टी ऐकून करणच्या देखील पायाखालची जमिन सरकली आहे. तिच्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया द्यावी, या विचारात तो दिसत आहे. अनुष्काने हा धक्कादायक खुलासा एका नॅशनल टेलिव्हिजनवर येत सांगितली होती.

करणनं अनुष्काला केलेला स्पर्श तिला अजिबात आवडलेला नाही. शोमध्ये करणने अनुष्काला अनेक गोष्टींचा उलगडा करणारे प्रश्न विचारले. त्यानंतर तो हळू हळू तिची टिंगल देखील करू लागला होता. ‘ए दिल है मुश्कील’च्या शूटिंगवेळी अनुष्का त्याची क्रश असल्याचे करणने स्वत: सांगितले.

अनुष्का म्हणते, मला या गोष्टीचा आनंद आहे. तुझ्या विरोधात सेक्शुअल हॅरेसमेंटची केस दाखल केल्याशिवाय राहणार नाही. करण मला नेहमीच ‘ए दिल है मुश्कील’च्या शूटिंगवेळी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. मात्र यावेळी कतरिनानं काही गोष्टी सांभाळून घेतल्याचे सांगितले जाते. त्यावेळी शो मध्ये अनुष्कासोबत कतरिनाने देखील हजेरी लावली होती.

अनुष्का एवढ्यावरच शांत बसली नाही, तिने पुढे देखील करणवर गंभीर आरोप लावले. शो मध्ये अनुष्काने जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही उल्लेख केल आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. तिथे जो काही प्रकार घडला तो अनेकांना माहिती आहे. त्यावेळी तिनं करणच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र यावेळी कतरिनानं विषय बदलला कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर ठरवता येईल की काय करायचे ते. मात्र यामुळे अनुष्का बरीच प्रकाशझोतात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT