भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने अभिनेत्री अवनीत कौरचा (Avneet Kaur) एक फोटो लाइक केला होता. त्यामुळे विराट चांगलाच चर्चेत आहे. तसेच त्याला यामुळे ट्रोल देखील करण्यात आले. विराट कोहलीने अवनीत कौरच्या फॅन पेजवरील तिचा एका बोल्ड फोटोला लाइक केले होते. ज्यात अवनीत कौरने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्रिंटेड रॅप स्कर्ट परिधान केला होता. त्यामुळे खूप चर्चा देखील सुरू झाल्या. त्यानंतर विराटने तो फोटो डिसलाइक देखीस केला. तसेच यासंबंधित विराटने स्पष्टीकरण देखील दिले. तो म्हणाला, "या मागे माझा कोणताही हेतू नाही. हे चुकून झाले आहे."
अशात आता विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा (Anushka sharma) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावरून विराट आणि अनुष्कामध्ये दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. अनुष्का विराटवर नाराज असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. विराट आणि अनुष्का दोघंही काल रात्री डिनरसाठी बंगळुरुमधील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तेथे रेस्टॉरंटमध्ये गाडीतून उतरताना विराटने अनुष्काला हात दिला. मात्र अनुष्का विराटचा हात न धरताच गाडीतून खाली उतरली आणि पुढे गेली. तिच्या या वागण्यातून ती नाराज असल्याचे दिसत आहे.
अनुष्का शर्माच्या मागोमाग विराट देखील रेस्टॉरंटमध्ये गेला. अनुष्का आणि विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये अवनीत कौरच्या प्रकरणामुळे अनुष्का शर्मा विराट कोहलीवर नाराज असल्याची चर्चा कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. ते कायम एकमेकांना पाठिंबा देताना पाहायला मिळते. विराट आणि अनुष्काने 2017 ला लग्नगाठ बांधली. यांना दोन क्युट मुलं देखील आहे. यांच्यातील प्रेमाची कायमच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. अनुष्का शर्माच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर विराट सध्या क्रिकेट सामन्यांमध्ये व्यस्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.