Anurag Kashyap Upcoming Movie Kenedy Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anurag Kashyap Unveils Poster: अनुराग कश्यपच्या 'केनेडी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सनी लिओनी-राहुल भट दिसणार मुख्य भूमिकेत

Anurag Kashyap Upcoming Movie: 'केनेडी'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.

Pooja Dange

Anurag Kashyap Upcoming Movie Kennedy First Poster Released: अनुराग कश्यप यांचे चित्रपट हे नेहमीच वेगळा विषय आणि आशय घेऊन येत असतात. त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याचे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. अनुराग यांची चित्रपट बनविण्याची पद्धत देखील वेगळी आहे. अशा या अनोख्या दिग्दर्शकाचा आणखी एक चित्रपट भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

'केनेडी' असे अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. 'केनेडी'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये 'मिडनाईट स्क्रीनिंग' श्रेणीमध्ये या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

अनुराग कश्यप यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आंख, कान्स सब खुले रखना...केनेडी आ रहा है! हे आहे #Kennedyचे अधिकृत पोस्टर, जे पुढील महिन्याच्या शेवटी फेस्टिव्हल डी कान्समध्ये प्रीमियरसाठी सेट आहे!'

'केनेडी' एका माजी पोलिसाची कथा आहे जो झोपत नाही. या पोलिसांचे खूप वर्षपूर्वी निधन झाले असल्याचे लोकांना वाटत आहे. परंतु तो जिवंत असून भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात काम आहे. (Latest Entertainment News)

चित्रपटाचे पोस्टर खूपच इंटरेस्टिंग आहे. या पोस्टरमध्ये गडद रंगाचा वापर केला असून त्या परिस्थितीची जाणीव होत आहे. पोस्टरमध्ये मुख्य अभिनेता राहुल भटने मुखवटा घातला आहे. राहुल भट पोलीस अधिकारी लेलाची भूमिका साकारत आहे. तर सनी लिओनी दरवाजाल उभी राहून ओरडत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे, त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. या चित्रपटामध्ये कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि यावेळी अनुराग काय नवीन घेत येत आहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT