Anupam Kher in Rabindranath Tagore Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anupam Kher Portraying Rabindranath Tagore : द ॲक्सिंडेंटल प्राईम मिनिस्टरनंतर अनुपम खेर साकारणार 'रवींद्रनाथ टागोर' ; फस्ट लूक शेअर

Anupam Kher in Rabindranath Tagore Look : अनुपम खेर यांनी चित्रपटातील रविंद्रनाथ टागोर यांच्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anupam Kher's first look as Rabindranath Tagore : भारतीय राष्ट्रगीताचे गीतकार रविंद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. अनुपम खेर यांनी चित्रपटातील रविंद्रनाथ टागोर यांच्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

भारताला स्वतंत्र मिळवण्यात अनेकांनी योगदान दिले आहे. त्यातील एक नाव म्हणजे रविंद्रनाथ टागोर. रविंद्रनाथ टागोर हे एक कवी होते. त्यांनी बंगाली भाषेत अनेक कविता लिहल्या आहेत. त्यांच्या आयुष्याची आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रविंद्रनाथ टागोर यांची भूमिका अनुपम खेर साकारणार आहेत.(Latest Entertainment News In Marathi)

सोशल मीडियावरुन अनुपम खेर यांनी स्वतः चा लूक रिव्हिल केला आहे.सोशल मीडियावर त्यांनी यांसंबधीत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या २०१९ मधील द अॅक्सिंडेंटल प्राईम मिनिस्टर आणि आताचा रविंद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील भूमिका असलेले फोटो शेअर केले आहेत.

या पोस्टमध्ये त्यांनी 'एका कलाकाराला वेगवेगळ्या लोकांची आयुष्य जगायला मिळतात.कलाकार आपल्या पात्रतेनुसार ती भूमिका साकारतात. या दोन्ही फोटोंमध्ये स्वतः ला पाहून मला खूप आनंद होत आहे.धन्यवाद' असं कॅप्शनही दिले आहे.

याआधीही अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात ते रविंद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत दिसत आहे. त्यांनी लांब पांढरे केस, पांढरी दाढी आणि त्यांच्या सारखी वेशभूषा केली आहे.

त्या पोस्टवर त्यांनी 'रविंद्रनाथ टागोर हा माझा ५३८ वा प्रोजेक्ट आहे.माझं हे सौभाग्य आहे की मला गुरुदेव यांच पात्र साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटाबाबत माहिती लवकरच तूमच्यापर्यंत पोहचवण्यात येईल' असं कॅप्शनमध्ये लिहलं होतं.

अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्यांचा कंगना रनौतसोबतचा 'इमरजन्सी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.तर त्यांचा 'द वॅक्सिन वॉर' आणि 'मेट्रो इन डिनो' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT