Ankush Chaudhary On Maharashtra Shaheer: अभिनेता अंकुश चौधरी सध्या आपल्या सिनेकारकिर्दीतील पहिल्या वहिल्या बायोपिकमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अंकुशने मुख्य भूमिका साकारली असून सध्या त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत ही भूमिका का साकारली याविषयी माहिती दिली.
अंकुशला आपण आता पर्यंत अनेक चित्रपटांमधून, नाटक आणि मालिकेच्या माध्यमातून भेटलो आहोत. नेहमीच आपल्या अभिनयातून सर्वच पात्रांना योग्य तो न्याय देण्याचा तो प्रयत्न करतो. दुनियादारीतला दिघ्या असो किंवा दगडी चाळीतला सूर्या असूद्या. या भूमिका प्रेक्षकांच्या मनात त्याचे अढळ स्थान निर्माण करून गेले. (Marathi Film)
नुकताच अंकुशने ’सकाळ डिजिटल’ सोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडले. यावेळी अंकुशने शाहीर साबळे यांचे पात्र का साकारले?,ना आवाज, ना चेहरा.. कशातच साम्य नसताना अंकुशने पात्र कसे काय साकारले याबद्दल त्याने दिलखुलास चर्चा केली आहे.
यावेळी अंकुश म्हणतो, “केदार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे, हे मलाही माहित होतं. पण त्यात मी असेल असं मला वाटलं नाही. जेव्हा मला केदारचा कॉल आला तेव्हा मलाच आश्चर्य वाटलं. मी शाहीर साबळेंसारखा दिसत नाही हे मलाही वाटत होतं. ही भूमिका मी कशी करणार याचं मलाही टेंशन आलं होतं. पण ही भूमिका करायला तयार झालो कारण एक गोष्ट केदार ने मला दाखवली.” (Marathi Actors)
त्यानंतर पुढे अंकुश म्हणतो, “मी ऐकत नाही म्हंटल्यावर केदार मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने शाहीर साबळे यांचे जुने फोटो मला दाखवले. त्यावेळी केदारने त्यांच्यातील आणि माझ्यातील अनेक सारख्या गोष्टी माझ्या नजरेत आणून दिल्या. त्यावेळी मला पटलं आपण ही भूमिका करू शकतो. असा मनात ठाम विचार केला आणि भूमिका साकारण्यासाठी तयार झालो...”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.