Nirmala kapoor demise  social media
मनोरंजन बातम्या

बॉलिवूड अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अनिल कपूर यांच्या आईचं निधन

Anil Kapoor Mother Nirmal Kapoor Death : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या.

Saam Tv

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर उर्फ सुचित्रा यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. आठवडाभरापासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनानं कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कपूर कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, आठवडाभरापासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

निर्मल कपूर या मागील आठवडाभर रुग्णालयात दाखल होत्या. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेते अनिल कपूर यांनी मागील वर्षी आईच्या जन्मदिनी खास पोस्ट शेअर केली होती. सोशल मीडियावर त्यांनी बालपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला होता. तर कुटुंबीयांसोबतचा आणखी एक फोटो त्यांनी शेअर केला होता. आईसाठी त्यांनी खास ओळीही लिहिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

SCROLL FOR NEXT