Aneet Padda in Ramp Walk Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aneet padda: सैयारा फेम अनित पड्डाचा पहिला रॅम्प वॉक; लॅक्मे फॅशन वीकच्या फिनालेची बनली शोस्टॉपर, पाहा VIDEO

Aneet Padda In Ramp Walk: "सैयारा" फेम अभिनेत्री अनित पड्डाने लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला. तिने शोस्टॉपर बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Shruti Vilas Kadam

Aneet Padda In Ramp Walk: सध्या लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे आणि सैयारा फेम अभिनेत्री अनित पड्डा या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाली. फिनालेच्या सुरुवातीलाच, अभिनेत्रीने पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आणि उपस्थित असलेल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अनित पड्डाचा ग्लॅमरस गाऊन

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अभिनेत्री अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने चमकदार गाऊन परिधान केला आहे. त्यामुळे तिचा लूक आणखी उठून दिसत आहे. शेवटी, रॅम्प सोडताना, अभिनेत्रीने चाहत्यांना एक फ्लाइंग किस दिला. तिच्या चेहऱ्यावरील हलकेसे हास्य तिला अत्यंत आकर्षक बनवत होते.

अभिनेत्री शोस्टॉपर बनली

व्हायरल व्हिडिओनुसार, अभिनेत्री अनित पड्डाने लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेची सुरुवात शोस्टॉपर म्हणून केली. सैयारामुळे घराघरात पोहोचल्या या अभिनेत्रीची स्टाईल नेटिझन्सना अभिनेत्रीची खूप आवडली असून सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच तिचा रॅम्प वॉक ट्रेंड करत आहे.

नेटिझन्सची प्रतिक्रिया

हा व्हिडिओ समोर येताच, नेटिझन्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने म्हटले की, "रॅम्पवर चालण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. ती खरोखरच घाबरली होती, पण तरीही तिने खूप छान वॉक केला, इतर अभिनेत्रींपेक्षा चांगले. आपण तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करायला हवे." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, "तिने खूप चांगले केले, कारण हा तिचा पहिलाच रॅम्प वॉक होता."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड सूत्रधाराचा खात्मा,सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Thane News: शिवसेना नेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा दुसरा VIDEO समोर, गोळीबाराचा आवाज ऐकून पळापळ

Maharashtra News Live Update: मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

Gold Price Today: सप्टेंबरच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा कितीला? २४, २२ अन् १८ कॅरेटचे दर

Organ Donation: काळजाचा तुकडा गमावला, पण वडिलांनी दुःख दूर सारलं; ९ वर्षांच्या आयुषचं हृदय आता रशियन मुलामध्ये धडकणार

SCROLL FOR NEXT