Ananya Pandy
Ananya Pandy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7: सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपबद्दल अनन्यानं केले खळबळजनक खुलासे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण- ७' रीलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या प्रत्येक सीझनमध्ये बॅालिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. अनेक बॅालिवूड स्टार्स या शोचा भाग बनले आहेत. या मोसमातील चौथ्या भागात अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandy) आणि साउथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Devarakonda) 'कॉफी विथ करण'चा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. करण जोहरच्या या चॅट शोमध्ये विजय देवरकोंडा पहिल्यांदाच सहभागी झाला होता. दरम्यान, अनन्या आणि विजय यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त अनेक खळबळजनक खुलासे या शोमध्ये केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

करण जोहरने अनन्या पांडेला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपबद्दल विचारले. शोमध्ये अनन्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शोच्या सुरूवातीला रॅपिड फायर राउंड दरम्यान अनन्या ही विजय आणि रश्मिकाच्या नात्याबद्दल स्पष्टपणे बोलली. पुढे करणने तिला टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्याबद्दल विचारले. त्यावर अनन्याने सांगितले की, मी दिशाला चांगली ओळखते, दिशाही खूप चांगली आणि मनमिळाऊ आहे.

या शोमध्ये करणने अनन्याला जान्हवी कपूरच्या रिलेशनशिपबद्दल विचारले तेव्हा, जान्हवी सिंगल असल्याचे तिने सांगितले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या नात्याबद्दल अनन्याने तिचे मत व्यक्त करताना, त्या दोघांचे 'रांता लंबिया' हे गाणं गात 'उनकी रातां काफी लंबिया है' असे म्हणाली. पुढे करणने तुझा रांझा कोण आहे विचारले, त्यावर अनन्या काही बोलणार तेवढ्यात करणने तिला थांबवले आणि करणने 'वेक अप सिड' म्हणत त्याचे बोलणे संपवले. यावर अनन्याने हसत हसत होकारार्थी उत्तर दिले.

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच अनन्या दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवराकोंडासोबत 'लायगर' या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'लायगर'चा ट्रेलर रीलीज झाला आहे. टीझरवरून चित्रपटात अनन्या मुख्य भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा 'लायगर' चित्रपट पुढच्या महिन्यात २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT