Mukesh and Nita Ambani Dance Viral Video: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mukesh and Nita Ambani: 'प्यार हुआ, इकरार हुआ', रोमँटिक गाण्यावर मुकेश अंबानी-नीता अंबानींचा डान्स; पाहा Viral Video

Anant-Radhika Wedding: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग इव्हेंट गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Satish Kengar

Mukesh Ambani and Nita Ambani Dance Viral Video:

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग इव्हेंट गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्री-वेडिंग इव्हेंट आजपासू सुरू झाला असून हा ३ मार्चपर्यंत चालणार आहे.

अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीच्या लग्नासाठी देश-विदेशातील प्रसिद्ध व्यतींनी प्री-वेडिंग इव्हेंटला हजेरी लावली आहे. प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी देश-विदेशातील सर्व स्टार्स सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर अंबानी कुटुंबाने या तीन दिवसीय कार्यक्रमात दररोज एक वेगळी थीम ठेवली आहे. या भव्य सोहळ्यातील एक परफॉर्मन्स खूप खास असणार आहे. या इव्हेंटमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी खास परफॉर्मन्स देताना दिसणार आहेत. या डान्सच्या रिहर्सलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डान्स रिहर्सलचा व्हिडिओ आला समोर

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या डान्स रिहर्सलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी परफॉर्मन्सची तयारी करताना दिसत आहेत. हे दोघेही राज कपूर आणि नर्गिस यांच्या 'श्री 420' या सुपरहिट चित्रपटातील 'प्यार हुआ इकरार हुआ है' या प्रसिद्ध गाण्यावर लिप-सिंक करताना आणि नाचताना दिसतात.  (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा लूकही खास दिसत आहे. यादरम्यान नीता यांनी साडी नेसलेली तर मुकेश अंबानी हे सूटमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत दोघेही खूप सुंदर दिसत असून त्यांचा हा रोमँटिक डान्स अनंत अंबानी यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावणाऱ्या स्टार्सची यादी बरीच मोठी आहे. या फंक्शनमध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, करण जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान यांच्यासह मनोरंजन आणि क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबियांसमवेत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT