Anant Ambani And Radhika Merchant Romantic Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Pre-Wedding: 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…' गाण्यावर अनंत-राधिकाचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल

Anant Ambani And Radhika Merchant Romantic Dance: या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनंत आणि राधिकाचा क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कपलने आपल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रोमँटिक डान्स करत सर्वांचे मन जिंकले.

Priya More

Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding:

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani And Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या प्री-वेडिंगला हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत आणि जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावली. तीन दिवस चालणारे हे प्री-वेडिंग फंक्शना रविवारी संपले. या फंक्शनमध्ये बॉलिवूड (Bollywood) आणि हॉलिवूडमधील (Hollywood) अनेक प्रसिद्ध गायकांनी गाणी गायली. तर कलाकारांनी डान्स परफॉर्मन्स करत उपस्थितांचे मन जिंकले. या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनंत आणि राधिकाचा क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कपलने आपल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रोमँटिक डान्स करत सर्वांचे मन जिंकले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे मन जिंकत आहे. या कपलच्या डान्सचे खूपच कौतुक होत आहे. अनंत आणि राधिकाने 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…' या सुपरहिट गाण्यावर डान्स केला. या डान्स व्हिडीओमध्ये दिसत आहे की हे कपल एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडाले होते. त्यांचा हा रोमँटिक डान्स सर्वांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत युजर्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचसोबत या व्हिडीओला खूप चांगले व्ह्यूज आणि लाइक मिळाले आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फक्शन ३ दिवस गुजरातच्या जामनगरमध्ये सुरू होते. रविवारी हे फंक्शन संपले. या फंक्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी धांसू डान्स परफॉर्मन्स केले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या बॉलिवूडच्या तीन सुपरस्टारने एकत्र डान्स परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोनने देखील यावेळी जबरदस्त डान्स केला.

याचदरम्यान, या फंक्शनमधील बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे त्याने पुन्हा एकदा आपल्या रोमँटिक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये किंग खान पत्नी गौरी खानसोबत रोमँटिक डान्स करताना दिसला. 'वीरा-झारा' या चित्रपटातील सुपरहिट गाणं 'मैं यहाँ हूं' या गाण्यावर दोघांनीही जबरदस्त डान्स केला. या फंक्शनच्या पहिल्या दिवशी पॉप संगर रिहानाने एनर्जेटिक परफॉर्मंन्स देत धुमाकूळ घआतला. दुसऱ्या दिवशी पंजाबी गायक दिलजीत दोसांझने आपल्या स्टाइलमध्ये मैफिल रंगवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT