Dharmaveer 2  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2: "धर्मवीर २' चा ओटीटीवर बोलबाला!! चित्रपटाला एकाच आठवड्यात मिळाले 'इतके' मिलियन व्ह्यूज

Dharmaveer 2 Movie: एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज "धर्मवीर २" या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Manasvi Choudhary

साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या "धर्मवीर २" या चित्रपटानं मोठा मान मिळवला आहे. झी5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज "धर्मवीर २" या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

"धर्मवीर २" या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, समीर धर्माधिकारी, हृषिकेश जोशी, आनंद इंगळे, कमलेश सातपुते, मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर "धर्मवीर २" हा चित्रपट झी5 या ओटीटीवर लाँच करण्यात आला.

झी 5 ओटीटीवर "धर्मवीर २" या चित्रपटाला एकाच आठवड्यात ५० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी वाळवी या चित्रपटाला एका आठवड्यात १४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यामुळे "धर्मवीर २" चित्रपटानं वाळवी चित्रपटाला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ओटीटीवरही जगभरातील प्रेक्षकांनी "धर्मवीर २" या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT