Amruta Khanvilkar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर पोहचली वाराणसीला; घेतलं काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन, पाहा PHOTOS

Amruta Khanvilkar Varanasi Trip : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर वाराणसीला पोहचली. ती गंगा आरतीत सहभागी झाली आणि काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले.

Shreya Maskar

अमृता खानविलकर वाराणसीला गेली आहे.

अमृताने व्हिडीओ शेअर करून गंगा आरतीची झलक दाखवली आहे.

अमृताने काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली.

लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar ) मोठा चाहता वर्ग आहे. ती अभिनयासोबत एक उत्तम डान्सर आहे. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो, व्हिडीओ, कामाचे अपडेट ती चाहत्यांना देत राहते. अमृताला फिरायला खूप आवडते. ती कायम कुठे ना कुठे फिरायला जाते. आता देखील अमृता खानविलकर मस्त वाराणसी फिरायला गेली आहे. सोशल मीडियावर स्टोरी टाकून तिने याची माहिती दिली आहे.

Amruta Khanvilkar

वाराणसी - बनारस - काशीचे फोटो आणि व्हिडीओ अमृताने शेअर केले आहेत. तिने नमो घाट, मणिकर्णिका घाट ला भेट दिली आहे. तसेच गंगा आरतीत सहभागी झाली आहे. तिने काशी विश्वनाथ धाम आणि काल भैरव नाथ या मंदिरात गेली आहे. तिने देवाचे दर्शन घेतले आहे. अमृता खानविलकर वाराणसी ट्रिप मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. काशी विश्वनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

अमृता खानविलकरने 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ, त्र्यंबकेश्वर उज्जैन महाकाल या मंदिरांना भेट दिली आहे. तिने फोटो आणि व्हिडीओ टाकून तेथील वातावरणाची झलक दाखवली आहे. व्हिडीओत गंगा आरती पाहायला मिळत आहे. अमृता खानविलकर अनेक वेळा देव दर्शन करताना दिसते. अमृता खानविलकरला 'महाराष्ट्राची चंद्रमुखी' म्हणून ओळखले जाते. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Amruta Khanvilkar

अमृता खानविलकरने मराठीसोबतच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अलिकडेच अमृता खानविलकर परेश रावल यांच्या 'द ताज स्टोरी' चित्रपटात झळकली. अमृताचे इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमृता खानविलकर अलिकडेच आपल्या आईसोबत 'बाली' या ठिकाणी फिरायला गेली होती. तिथे तिने सुंदर वेळ घालवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT