Amruta Khanvilkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: सातासमुद्रापार अमेरिकेत थिरकली चंद्रा, 'या' लोकप्रिय गाण्यावर केला डान्स

अमृता खानविलकरने अमेरिकेत चंद्रमुखी गाण्यावर पहिल्यांदाच नृत्य केलं. तिचा पारंपरिक अंदाज आणि लावण्यपूर्ण नृत्य सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

२९ एप्रिल २०२२ रोजी रिलीज झालेल्या प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या चित्रपटाने चांगलाच गाजावाजा केला. या चित्रपटाचा ट्रेलर, चित्रपटातील गाणी चांगलीच गाजली. या चित्रपटात अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' या गाण्यावर थिरकलेली दिसली. अमृताच्या मनमोहक सौंदर्य आणि नृत्याच्या अदाकारीने सर्वांनाच वेड लावलं. अद्यापही या चंद्रमुखी गाण्याची क्रेझ काही कमी झालेली दिसत नाही. नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्रमुखीविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या लक्ष वेधून घेत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. चंद्रमुखीच्या अस्सल मराठमोळ्या अंदाजात अभिनेत्री दिसत आहे. नृत्यातील हटके फोटो तिने शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने, पहिल्यादांच अमेरिकेत चंद्रमुखी या गाण्यावर थिरकले आहे. सर्वांना धन्यवाद @ashishpatil_the_lavniking @kallolentertainment असं म्हटलं आहे. पुढे तिने, अजून ३ शो होणार आहेत. तुम्ही तिकीट बुक केले का? नसतील केले तर @kallolentertainment या पेजवरून करा असलं म्हटलं आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. आता अभिनेत्रीने अमेरिकेत नृत्याविष्कार केला आहे. सोशल मीडियावर अमृतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमृताचे अनेक चाहते चंद्रमुखी 2 च्या प्रतिक्षेत आहे. मात्र अद्यापही अधिकृतपणे चंद्रमुखी 2 या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकरसह आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर ही देखील कलाकार मंडळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालखीत वारक-यांना लुटणारे चोरकरी, पुण्यात वारीत चोरी, धास्तावले वारकरी, खाज-खुजली टाकून लुटणारी टोळी

एकापेक्षा अधिक लग्न केल्यास सरकारी नोकरी जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ऑपरेशन टायगर 4.0 लवकर होणार? नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार?

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT