Amruta Fadnavis SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी लेकीसह गाणं गाऊन दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, पाहा VIDEO

Amruta Fadnavis New Year Wish: अमृता फडणवीस यांनी आपल्या मुलीसोबतचा गाण्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यातून त्यांनी प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Shreya Maskar

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस या आपल्या मुलीसोबत पाहायला मिळत आहे. त्यांच्या मुलीचे नाव दिविजा फडणवीस आहे. या दोघांनी मिळून प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्या आपल्या लेकीसोबत सुरेल गाणे गात आहेत. अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस स्वतः एक सुंदर गायिका आहेत. मुलीने देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवलेले पाहायला मिळत आहे.

अमृता फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपल्या मुलीसोबत इंग्रजी भाषेत गाणे गायले आहे. त्यांच्या गाण्याचे सूर खूपच सुंदर लागले आहेत. दोघीसुद्धा व्हिडीओमध्ये खूप आनंदाने आणि हसत गाणे गाताना दिसत आहे. दोघीही गाण्याचा पुरेपूर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

अमृता फडणवीस यांनी गाण्याचा व्हिडीओ शेअर करून त्याला एक हटके कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "नववर्षाच्या शुभेच्छा.... प्रेम आणि प्रियजनांसोबत वर्षभर प्रवास करा!" अशा प्रेममय शुभेच्छा अमृता फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांचा लाइक्स, कमेंट पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या आणि त्यांची लेक लाल फ्लोरल प्रिंट नाइट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. दोघी एकत्र खूप छान दिसत आहे. त्या दोघीही गाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. अमृता फडणवीस यांनी या आधी देखील गाणी गायली आहे. त्यांचा गोड आवाज अनेकांना खूप आवडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: eKYC करुनही २४ लाख लाडक्या बहि‍णींना डिसेंबरचे ₹१५०० आलेच नाहीत; कारण काय?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्षांना इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी

Success Story: ९ वर्षांची मेहनत, ८ वेळा अपयश, लग्नासाठी दबाव; कठीण परिस्थितीवर मात करत केली MPPSC क्रॅक; DSP मयंका चौरसिया यांचा प्रवास

Todays Horoscope: आज तुम्ही लपवून ठेवलेल्या गोष्टी सर्वांसमोर येऊ शकतात, जाणून घ्या राशीभविष्य

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT