amruta fadnavis new song Saam tv
मनोरंजन बातम्या

महादेवासाठी गाताना थेट त्यांच्याशीच बोलते...; ‘शंभू रे’ भजनाविषयी अमृता फडणवीसांची भावना, VIDEO

amruta fadnavis new song: अमृता फडणवीस यांचं ‘शंभू रे’ भजन लाँच झालं आहे. या भजनाविषयी बोलताना मोठं भाष्य केलं आहे.

Saam Tv

'शंभू रे भक्तिगीत लाँच करण्यात आलंय

अमृता फडणवीस यांचा भावस्पर्शी आवाज चर्चेत आलाय

भगवान शिवांना अर्पण केलेले आध्यात्मिक भजन असल्याची भावान अमृता यांनी बोलून दाखवली

गणेश कवडे, साम टीव्ही

टी-सीरिज प्रस्तुत, भावस्पर्शी अमृता फडणवीस यांचं नवे भक्तिगीत “शंभू रे” लाँच झालं आहे.. भगवान शिवजींना अर्पण केलेले एक हृदयस्पर्शी भजन आहे. भक्तीच्या मुळाशी रुजलेले आणि मनापासूनच्या संगीत अभिव्यक्तीने अधिक उंचावलेले हे गीत शिवभक्तीचा कालातीत सार पकडते आणि शांतता, सामर्थ्य व आध्यात्मिक स्थैर्य जागवते, अशी भावना व्यक्त केल्या जात आहेत.

श्रीजन यांनी सुंदर शब्दरचना लिहिलेली आहे. तर संगीत रचना प्रसिद्ध संगीतकार मॉन्टी शर्मा यांनी केली आहे. “शंभू रे” हे त्याच्या भावनिक खोलीसाठी आणि निर्मळतेसाठी विशेष ठरतंय. या भजनासोबत राजीव वालिया दिग्दर्शित एक अत्यंत शांत, दिव्य असा संगीत व्हिडिओही सादर करण्यात आलाय. या गीतात अमृता फडणवीस दिव्यता, कृपा आणि मनापासूनच्या भक्तिभावाने हे गीत सादर करण्यात आलंय. या गीतात श्रोते आणि प्रेक्षकांसाठी हा अनुभव ऐकण्यासोबतच पाहण्यासही एक संपूर्ण आध्यात्मिक अनुभूती ठरतोय.

या भजनाविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “शिव माझ्या श्रद्धेचा फक्त एक भाग नसून ते एक भावना आहेत. ‘शंभू रे’ हे माझं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम आहे. प्रत्येक वेळी मी महादेवासाठी गाते. त्यावेळी मला वाटतं की मी थेट त्यांच्याशी बोलतेय. व्हिडिओचं शूटिंग करतानाही मला असं वाटलंच नाही की मी परफॉर्म करतेय. त्यावेळी खरोखर भक्ती आणि समर्पणाचा क्षण वाटत होता. हे भजन आणि त्याचे दृश्य, जे ऐकतील आणि पाहतील त्यांच्या सर्वांना तसंच शांततेचं अनुभूती देतील, जशी शिवाची उपस्थिती मला शांतता देते, अशी माझी आशा आहे.

या रिलीजसह, अमृता भारतीय भक्तिसंगीत परंपरेत खोलवर रुजलेला संगीतप्रवास पुढे नेत आहेत. आजच्या त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. जे ध्वनीतून दिलासा, सामर्थ्य आणि दिव्यता शोधतात. “शंभू रे” आता सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्याचा अधिकृत संगीत व्हिडिओ टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर एक्सक्लुझिव्ह स्वरूपात पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT