Amruta Deshmukh Mother Emotional Post Instagram
मनोरंजन बातम्या

Prasad And Amruta News: ‘जावई असावा तर असा...’ लेक सासरी जाण्याआधीच अमृताच्या आईची भावनिक पोस्ट; प्रसाद कमेंट करत म्हणाला...

Prasad Jawade And Amruta Deshmukh News: प्रसादने सोशल मीडियावर अमृताच्या आणि अमृताच्या आईच्या फोटोवर कमेंट केली आहे. सध्या अभिनेत्याने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Amruta Deshmukh Mother Emotional Post

‘बिग बॉस मराठी ४’मध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात या दोघांची मैत्री झाली आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्या मैत्रीचं रुपांतर केव्हा प्रेमात झालं काही कळलंच नाही. जोडीने जुलै महिन्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली होती. नुकताच प्रसादने सोशल मीडियावर अमृताच्या आणि अमृताच्या आईच्या फोटोवर कमेंट केली आहे. सध्या अभिनेत्याने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.

अमृता देशमुख ‘बिग बॉस मराठी ४’नंतर एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘नियम व अटी लागू’ च्या माध्यमातून अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. संकर्षण कऱ्हाडेसोबत अमृता देशमुख मुख्य भूमिकेत असून सध्या नाटकाची टीम परदेश दौऱ्यामध्ये व्यग्र आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला नाटकाची टीम परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली होती. त्यांचा हा दौरा जवळपास ३५ दिवसांचा आहे. सध्या अमृता त्या नाटकाच्या परदेश दौऱ्यामध्ये व्यग्र असून आई वैशाली देशमुख लेकीच्या आठवणीत भावूक झालेल्या दिसल्या.

त्यांनी अमृतासोबतचा फोटो पोस्ट करुन कॅप्शन दिले की, “नाटकाचा अमेरिका दौरा जरा जास्तच मोठा होता... नाही का.. लग्नाआधीच लेक सासरी गेल्याचा फील येतोय मला.. Miss u soo much अमृता.. भेटू लवकरच...”

आई वैशाली देशमुख यांच्या पोस्टवर प्रसादने कमेंट केली की, “लग्नानंतरपण सासरी जाण्याचा फील घेऊ देणार नाही तुम्हाला!!!” त्यावर अमृताने हार्ट इमोजीची प्रतिक्रिया दिली आहेत. तर अमृताच्या आईने सुद्धा प्रसादच्या कमेंटवर उत्तर दिलंय. त्यांनी ‘मग ठीके...’ अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, प्रसाद- अमृताने २२ जुलै रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत गुपचूप साखरपुडा केल्याची घोषणा केली होती. तर येत्या १८ नोव्हेंबरला हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT