Anand Mahindra share amitabh bachchan video Saam TV
मनोरंजन बातम्या

Recreation Of Amitabh Bachchan Song : आजी-आजोबांनी अमिताभ बच्चन - मौसमी चॅटर्जी'चं 'रिमझीम गिरा सावन' केलं रिक्रिएट ; आनंद महिंद्रानीही केलं कौतुक

Viral Video : अमिताभ बच्चन यांच्या 'रिमझीम बरसा सावन' या गाण्याचं आता एका वयोवृद्ध जोडीने रिक्रिएशन केलं आहे

Pooja Dange

Recreation Of Amitabh Bachchan Song Goes Viral : पाऊस आणि गाणी यांच एक घट्ट नात आहे. पावसात गाणी ऐकली नाही तर पावसाची मज्जा नाही. अशातच जुन्या गाण्यानी तर अजूनच बहार येते. असंच अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जींच पावसावर आधारित 'रिमझीम सावन बरसा' हे गाणं आपल्याला पुन्हा त्या काळात घेऊन जातं. याच गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई आणि पावसाचं नात खूपच खोल आहे. पाऊस,चहाचा कप आणि गाण्यांची मैफिल म्हणजे सूख. यातच अमिताभ बच्चन यांच रिमझीम बरसा सावन हे गाणं वेगळीच बहार आणतं.

अमिताभ बच्चन यांच्या 'रिमझीम बरसा सावन' या गाण्याचं आता एका वयोवृद्ध जोडीने रिक्रिएशन केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'मंजिल' चित्रपटातील या गाण्यातील अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जींची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांना आवडते.

अमिताभ आणि मौसमी यांची केमिस्ट्री असलेल्या 'रिमझीम बरसा सावन' या गाण्याचं रिक्रिएशन आता एका वयोवृद्ध जोडीने केलं आहे. ही जोडी सगळ्यांना थेट ९०च्या दशकात घेऊन गेली आहे. त्यांनी अमिताभ आणि मौसमी यारखेच कपडे परिधान केले आहे.

गाण्याचं शुटिंग हे मुंबईत झाले होते. तसंच या जोडीनेही मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि मरिन लाईन्सच्या परिसरात शुटिंग केलं आहे. गाण्यात दाखवलेला प्रत्येक सीन या जोडीने रिक्रिएट केला आहे. या जोडीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

आनंद महेंद्रानीही केलं कौतुक

आनंद महिंद्रा हे भारतातील उद्योगक्षेत्रातील मोठं नाव आहे. आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावरुन नेहमीच काही न काही शेअर करत असतात. आनंद महिंद्रानीही या रिक्रिएट केलेल्या गाण्याचा व्हिडिओ ट्वीटरवरुन शेअर केला आहे. 'या वयोवृद्ध कपलने पुन्हा एकदा रिमझीम गिरे सावन हे गाणं रिक्रिएट केलं आहे.

मुंबईतील ज्या ठिकाणी खऱ्या गाण्याचं शुटिंग झाले होते त्याच रस्त्यावर हेही गाणं शुट केलं आहे. ते आपल्याला सांगत आहेत की, जर तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरली तर तुम्ही आयुष्य तुम्हाला हवे तसे सुंदर बनवू शकता...! असं म्हणत त्या कपलच कौतुक केलं आहे.

१९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मंजिल' चित्रपटातील हे गाणं आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी हे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटातील 'रिमझीम बरसा सावन' हे गाणं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Maharashtra Rain Live News: चेंबूर वाशी नाकामध्ये एमएमआरडी संरक्षणभिंत कोसळून 7 झोपड्यांचे नुकसान

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

Maharashtra Tourism: शांत आणि थंड ठिकाणी फिरण्याचा प्लान करताय? मग रत्नागिरीमधील 'हे' हिडन जेम ठरेल बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT