Amitabh Bachchan Injured During Kbc 18 Shoot, Reveals Knee Injury saam tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan slip : अमिताभ बच्चन यांना सेटवरच अपघात, शूटिंगवेळी पाय घसरून पडले; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Amitabh Bachchan Slips and Falls At KBC 18 Shoot: KBC 18 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन पाय घसरून खाली पडले. यात त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. बिग बींनी स्वतः दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

Bharat Jadhav

  • KBC 18 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा पाय घसरून ते पडल्याची घटना घडली.

  • या घटनेत त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी दिली.

  • अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती १८चे सूत्रसंचालक असून शोचे शूटिंग सुरू आहे

'कौन बनेगा करोड़पती' शोच्या शुटिंगवेळी मोठा अपघात घडलाय.या कार्यक्रमाचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन हे पाय घसरून खाली पडले असून त्यांच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे अमिताभ बच्चन यांना उभे राहता येत नाहीये.'केबीसी १८' (KBC 18) च्या भागात खुद्द बिग बींनी आपल्या प्रकृतीबाबतची ही माहिती दिलीय.

अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपती १८'कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. या शोचं शुटिंग करताना त्यांच्यासोबत मोठा अपघात घडला. अमिताभ बच्चन प्रत्येक भागाची सुरुवात मोठ्या उत्साहाने करतात.शो सुरू होताना ते पळत येतात आणि शो सुरू करतात. अमिताभ बच्चन हे नेहमी प्रमाणे शोची सुरुवात करत होते,त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. यात त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्यांना यामुळे उभे राहता येत नाहीये. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच खुलासा केलाय.

आपल्या प्रकृतीची माहिती देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, "सहसा मी मंचाच्या मध्यभागी उभे राहून माझा संवाद बोलत असतो. पण आज माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. "काल शुटिंगदरम्यान माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो. ज्यामुळे माझ्या गुडघ्याला दुखापत झाली.या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचं त्यांनी सांगितलंय.

अमिताभ बच्चन यांनी शुट करताना स्टुडिओमधील प्रेक्षकांना याची माहिती दिली. त्यामुळे चाहते चिंतेत पडलेत. स्टुडिओतील प्रेक्षकांनी चिंता व्यक्त करत त्यांची विचारपूस केलीय. चाहत्यांचं प्रेम पाहून आपल्याला नवी ऊर्जा मिळाल्याचं म्हणत ही दुखापत गंभीर नाहीये. उभं राहणं अवघड झालं असेल किंवा जमत नसेल तरी मी उभा राहील.

मात्र, सुरुवातीच्या प्रास्ताविक भागाचा संवाद मी बसून बोलेन, असं अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले. दरम्यान स्टुडिओमधील प्रेक्षकांनी देवाकडे प्रार्थना केलीय की, त्यांचे आवडते अभिनेते अमिताभ बच्चन हे लवकरात लवकर बरे व्हावेत. दरम्यान इंडियन एक्स्प्रेस या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिलंय.

दरम्यान अमिताभ बच्चन यांनी आदल्या दिवशीचा शो पुढे चालू ठेवत स्पर्धक शौर्य दास यांचे स्वागत केले. शौर्य यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत यशस्वीपणे खेळ केला, परंतु ५० लाख रुपयांच्या प्रश्नाने मात्र त्या गोंधळात पडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या; प्रदीप पूर्णेकरांवर कार्यालयातच गोळीबार

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT