Amitabh Bachchan Saam tv
मनोरंजन बातम्या

Celibrity Accident: हेमा मालिनी ते अमिताभ बच्चन, 'या' दिग्गज कलाकारांचाही झाला होता भीषण अपघात

अलिकडच्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचाही असाच भीषण अपघात झाला ज्यामध्ये हे कलाकार गंभीर जखमी झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood Celibraty Accident: भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. शुक्रवारी पहाटे दिल्लीहून डेहराडूनकडे जात असताना डुलकी लागल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर गाडीने पेट घेतला ज्यामध्ये कार जळून खाक झाली. सुदैवाने काच फोडून गाडीतून बाहेर आल्याने रिषभ पंत थोडक्यात बचावला असून त्याच्यावर डेहराडूनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचाही असाच भीषण अपघात झाला ज्यामध्ये हे कलाकार गंभीर जखमी झाले होते. (Rishabh Pant)

मलायका अरोरा: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचाही सहा महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता.ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. शूटिंग संपवून मुंबईकडे येत असताना महामार्गावर तिचा अपघात झाला होता. यावेळी अपघाताने तिला काही काळ दिसेनासे झाले होते, असेही तिने सांगितले होते.

हेमा मालिनी- बॉलिवूडची ड्रीम गर्ल यांचाही २०१५ मध्ये भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्यांच्या जखमा पाहून त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र सुदैवाने त्या अपघातातून त्या बचावल्या आणि बऱ्याही झाल्या.

अनु अग्रवाल- आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवालचाही भीषण कार अपघात झाला होता. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. अपघात इतका भीषण होता की अभिनेत्रीला कित्येक वर्ष कोमात ठेवण्यात आले होते. या अपघातानंतर अभिनेत्रीला सिनेसृष्टीपासूनही बराच काळ लांब राहावे लागले होते.

शबाना आझमी- जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचाही पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांची कार एका ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला होता. गाडीमध्ये त्यांचे पती जावेद अख्तरही होते, मात्र त्यांना या अपघातात जखम झाली नव्हती.

अमिताभ बच्चन- बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातातून ते कसे बसे वाचले होते. (Amitabh Bachchan)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT