Amitabh Bachchan Emotional Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Emotional Video: बॉलिवूडच्या 'शहेनशहा'ला वाढदिवसानिमित्त 'KBC 15'नं दिलं खास गिफ्ट; बिग बी म्हणाले, 'आणखी किती रडवणार'

Chetan Bodke

Amitabh Bachchan KBC 15 Set Emotional Video Viral

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या बिग बींनी अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. वयाची ऐंशी ओलांडली तरी बिग बी भारतीय मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. उद्या बिग बींचा ८१ वा वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी केबीसीचं होस्टिंग करीत आहेत. त्यांनी KBC च्या सेटवर अनोखं सेलिब्रेशन करण्यात आलंय. आपल्या सहकाऱ्यांनी केलेलं सेलिब्रेशन पाहून त्यांचे डोळे पाणावलेत.

सेटवर पोहोचताच त्यांना मालिकेतल्या आपल्या सहकाऱ्यांनी एक सरप्राइज दिलं आहे. सहकाऱ्यांनी दिलेली अनोखी भेटवस्तू पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. नुकतंच मालिकेच्या निर्मात्यांनी ‘कौन बनेगा करोडपती १५’ च्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बींचे अश्रू अनावर झालेले दिसत आहेत.

बिग बी प्रोमोमध्ये म्हणतात, ‘मला अजून किती रडवणार आहात?, मी नेहमीच लोकांना टिशू देतो, आज मलाच टिशू देण्याची गरज भासलीय. नेहमीच माझा या सेटवरील वाढदिवस खूप खास होतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा वाढदिवस खास साजरा केला जात आहे. या सरप्राइजसाठी केबीसी टीमचे खूप खूप आभार...’

ई- टाईम्सच्या बातमीनुसार, बिग बींसाठी त्यांच्या टीमने अनेक सरप्राईज प्लॅन केले होते. यामध्ये प्रसिद्ध सरोद वादक, पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांनीही बिग बींना खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच यावेळी चिरंजीवी, विकी कौशल, विद्या बालन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि आर.माधवन या कलाकारांनी खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांचा उद्या ८१ वा वाढदिवस असून ते सध्या KBC 15 चं सूत्रसंचालन, जाहिराती, फिल्म शूटींग अशा अनेक गोष्टी मॅनेज करताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT