Amisha Patel Saam tvT
मनोरंजन बातम्या

Amisha Patel: बीचप्रेमी अमिषा पटेलच्या बोल्डनेसने चाहत्यांना केले गार

अमिषा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Pooja Dange

Amisha Patel New Video: बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याच्या पहिल्या चित्रपटामधील अभिनेत्री अमिषा पटेल सर्वांच माहित आहे. अमिषा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर ती ट्रेंड करत असते.

अमिषा पटेलने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या हॉट व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. अमिषा यावेळी रिव्हिलिंग कपड्यांमध्ये दिसत आहे. अमीषा गुलाबी कॅप, सनग्लासेस आणि गुलाबी ब्रॅलेट टॉपमध्ये हॉट दिसत आहे. अमिषाच्या या व्हिडिओवर लोक अनेक कमेंट करत आहेत.

अमिषा पटेलचा हा व्हिडिओ बहरीनचा आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले- मुंबईत परतले… पण सुंदर बहरीन आणि बीचवरील व्हॉलीबॉल खेळ विसरता येत नाही… मी बीच प्रेमी आहे आणि मला खेळ खेळायला आवडतात. ही काही पहिली वेळ नाही जेव्हा अमिषा समुद्रकिनाऱ्यावर अतिशय हॉट स्टाईलमध्ये दिसली. याआधीही तिने अनेकदा बिकिनीमध्ये तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे. (Celebrity)

अमिषा पटेल सध्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2023 मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट गदर-2 प्रदर्शित होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. याआधी 'गदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले होते. अमिषा पटेलने या चित्रपटात सकीनाची भूमिका साकारली होती. सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT