Ameesha Patel Slams Content On OTT Platforms Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ameesha Patel On OTT Content: ओटीटीवरील अडल्ट कंटेंटवरून अमिषा पटेल भडकली; म्हणाली, 'प्रेक्षकांना चांगले चित्रपट...'

Ameesha Patel Slams Content On OTT Platforms: आमिषाने ओटीटी विश्वाबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केलय.

Chetan Bodke

Amisha Patel Latest News: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर २’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर अभिनेत्री अमिषा पटेल आणि अभिनेता धर्मेंद्र यांची जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. येत्या ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होत असून चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत आमिषाने ओटीटी विश्वाबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केलय.

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “प्रेक्षकवर्गाला चांगले चित्रपट पाहायला आवडतात. आजचा प्रेक्षक वर्ग अशा चित्रपटांची मागणी करतो, ते तो चित्रपट आपल्या फॅमिली सोबत बसून घेऊ शकतात. सध्याच्या प्रेक्षकांचा सर्वाधिक कल हा ओटीटीवर आहे. तिथला प्रेक्षकवर्ग पाहता, खूप वेगळा कंटेंट दाखवला जात आहे. हा कंटेंट प्रत्येक वयोगटातील लोकांना बघण्यासाठी योग्य आहे, असं नाही. ओटीटीवर प्रेक्षकांना असा कंटेंट दाखवायला हवा जो आपल्या मुलांसोबत आणि आजी-आजोबांसोबत बसून बघितला जाऊ शकतो.”

ती पुढे म्हणते, “ओटीटीवर अनेकदा समलैंगिक विषायावर चित्रपट आणि वेब सीरिज सर्रास दाखवले जातात. प्रेक्षकांना ओटीटीवर पूर्णपणे, होमो, लेस्बियन यांच्यावर आधारित सीन्स दाखवले जातात. जे बघताना प्रेक्षकांना त्यांच्या सहाजिकच मुलांच्या डोळ्यांवर हात ठेवावा लागतो. अनेकदा प्रेक्षकांना त्यांच्या टीव्हीला, मोबाइलला किंवा लॅपटॉपला चाइल्ड लॉकही लावावे लागतो. जेणेकरून लहान मुलं OTT प्लॅटफॉर्म ओपन करू शकणार नाहीत. म्हणून पालकांना हे काम करावं लागतं.” अशी अभिनेत्री आपल्या मुलाखतीत म्हणाली.

अमिषाने आतापर्यंत ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘भुलभुल्लैया’, ‘रेस २’ या चित्रपटातून अभिनेत्री सर्वाधिक प्रकाशझोतात आली. या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेत्री चाहत्यांमध्ये सर्वाधिक प्रकाशझोतात आली. अमिषाचा येत्या ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा सिक्वल गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या ‘गदर २’ ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आमिषाने चित्रपटात सकिनाचे पात्र साकारले असून सनी देओल यांनी ‘तारा सिंह’चे पात्र साकारले.

‘गदर २’ हा चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’ चा सिक्वेल आहे. ‘गदर एक प्रेम कथा’ हा चित्रपट २२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून अमिषा आणि सनी देओल यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा २२ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. ‘गदर एक प्रेम कथा’ प्रमाणेच ‘गदर २’ देखील कमाई करणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT