Anant-Radhika Engagement
Anant-Radhika Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Engagement: हम साथ साथ है! अंबानी कुटुंबियांच्या डान्सची देशभर चर्चा

Pooja Dange

Ambani Family Dance Video In Anant-Radhika Engagement: उद्योगपती वीरेन मर्चंड यांची कन्या राधिका मर्चंड आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा काल साखरपुडा पार पडला. अंबानी यांच्या अँटिलीया या बंगल्यात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा झाला. अंबानी कुटुंबियांनी वर आणि वधूसाठी खास डान्स देखील केला.

अंबानी कुटुंबीयांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. राधिका आणि अनंतसाठी अंबानी कुटुंबियांनी खास डान्स केला आहे. डान्स व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी मध्यभागी आहेत, मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहता एका बाजूला तर मुलगी ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल दुसऱ्या बाजूला होते.

बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट "हम आपके है कौन"मधील 'वाह वाह रामजी' या गाण्याच्या व्हर्जनवर अंबानी कुटुंबियांनी डान्स केला आहे. 'वाह वाह रामजी....... अनंत ओर राधिका को बधाई हो बधाई' असे बदल त्यांनी मूळ गाण्यात केले असून त्यावर डान्स केला आहे.

राधिका मर्चंड या खास समारंभासाठी सोनेरी लेहेंगा निवडला तर अनंत अंबानींनी निळ्या रंगाचा पोशाख घातला होता. अंबानी आणि मर्चंड कुटुंबियांनी 2019मध्ये राधिका आणि अनंत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती.

"गुड धाना आणि चुनरी विधी यासारख्या जुन्या परंपरा - गुजराती हिंदू कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या पाळल्या जात होत्या - कौटुंबिक मंदिरात मोठ्या उत्साहाने पार पाडल्या गेल्या," असे अंबानींनी एका निवेदनात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT