Alpha Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alpha Trailer: सीताच्या मदतीला येणार एजंट कबीर? आलिया भट्टच्या अल्फाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Alpha Trailer: आलिया भट्टच्या ‘अल्फा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Alpha Trailer: आलिया भट्टच्या बहुप्रतीक्षित ‘अल्फा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या थरारक कथानकाची आणि रहस्यमय पात्रांची झलक पाहायला मिळत असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेलरची सुरुवात बॉबी देओलच्या दमदार आवाजाने होते. तो एका लहान मुलीची ओळख करून देताना सांगतात की तिच्या आईचे नाव जानकी होते आणि हीच नाव ‘सीता’ असणार. त्यानंतर आलिया भट्टची धमाकेदार एन्ट्री होते. ती एका राक्षसाची आणि राजकुमारीची कथा सांगते. “यावेळी सीता स्वतः लंका जाळायला आली आहे,” असे बोलून स्वत:ची ओळख करुन देते.

ट्रेलरमध्ये एक मोठा ट्विस्ट समोर येतो. बॉबी देओल हा आलियाचा खरा वडील नसून, त्याने तिला लहानपणी एका गुप्त मोहिमेसाठी पळवून नेल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘अल्फा’ नावाच्या मिशनसाठी त्याने तिला ट्रेनिंग दिली मात्र आता तीच सीता त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. चित्रपटात बॉबी देओल ‘फतेह’ ही व्यक्तीरेखा साकारत आहे. दरम्यान, या ट्रेलरमध्ये शर्वरी वाघ देखील दिसते तिची आणि आलियाची केमेस्ट्री या ट्रेलरमध्ये बहिणींसारखी आहे. तसेच अनिल कपूर यांचीही ट्रेलरमध्ये महत्त्वपूर्ण झलक पाहायला मिळते. सरप्राईज म्हणजे शेवटच्या क्षणी हृतिक रोशनची खास एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्याची पूर्ण झलक नाही पण त्याचे डोळे दाखवून हा ट्रेलर संपतो.

अल्फा’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सातवा चित्रपट आहे. विशेष म्हणजे फिमेल स्पाय असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. शिव रवैल दिग्दर्शित आणि उदय चोप्रा लिखित ‘अल्फा’ हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai - Pune Travel: मुंबई-पुणे आता फक्त ४८ मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? वाचा

Political News: मोठी बातमी! माजी मंत्र्यांना पोलिसांकडून अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Rohit Sharma: मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड; राहुल द्रविडलाही टाकले मागे

काचेच्या बांगड्याची फॅशन जुनी झाली, यंदा वटपौर्णिमेला खरेदी करा 'या' ५ नवीन डिझाईन्सच्या हिरव्या बांगड्या

SCROLL FOR NEXT