Allu Arjun Share Video On Instagram  Saam TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Share Video: आलिशान घरासह अल्लू अर्जुनने दाखवली 'Pusha 2: The Rule'च्या सेटची झलक

Allu Arjun From Pushpa 2 Set: अल्लू अर्जुन एक भन्नाट व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.

Pooja Dange

Allu Arjun Spend Time With Fans and Family:

'पुष्पा' म्हटलं की आपसुक 'झुकेगा नहीं साला' हे शब्द आपण उच्चारतो. पुष्पा चित्रपटामुळे जगभरीतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आभिनेता अल्लू अर्जुनला नुकताच राष्ट्रीय पुकस्कार मिळाला आहे.

अल्लू अर्जुन पुढील चित्रपट आणि 'पुष्पा'च्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक खूप आधीच रिव्हील झाला आहे. तसेच या चित्रपटाचा छोटा टीझर देखील आपल्या भेटीला आला होता.

दरम्यान अल्लू अर्जुन आता 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अल्लू अर्जुन एक भन्नाट व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 'पुष्पा २'च्या सेटवरील हा व्हिडीओ असून अल्लू अर्जुन या व्हिडीओच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

अल्लू अर्जुनाचा व्हिडीओ

अल्लू अर्जुनच्या या व्हिडीओची सुरुवात त्याच्या घरापासून होते. ट्रॉफीज, ऑफिस आणि घरात इतर गोष्टी व्हिडीओच्या सुरुवातीला दाखविण्यात अळूचे आहेत. त्यानंतर अल्लू अर्जुन व्हिडीओमध्ये म्हणतो, हाय इंस्टाग्राम, आज मी तुम्हाला 'पुष्पा २: द रुल'च्या सेटवर घेऊन जाणार आहे. त्याआधी मी तुम्हाला माझं घर दाखवतो. जिथून माझ्या दिवसाची सुरुवात होते.'

घराची झलक दाखवताना अल्लू अर्जुन घरातील गार्डन, त्याची मेडिटेशन करायची जागा आणि स्विमिंग पूल अशा काही गोष्टी दाखवतो. तसेच तो म्हणतो की आम्हाला लख्ख सूर्यप्रकाश आम्हाला हवा असतो. त्यानंतर कॉफी पिऊन झाल्यावर तो त्याच्या कामाला निघतो.

दुपारी एक वाजता तो नेहमी त्याच्या घरी फोन करतो. त्याच्या दोन्ही मुलांशी गप्पा मारतो. हे तो प्रवासादरम्यान करतो. त्यानंतर शूटिंगला जात असताना त्याने भारतातील त्याच्या फॅन्सचे कौतुक केले आहे.

'पुष्पा २' चे शॉटिंग जगातील सर्वात मोठ्या सेट रामोजी फिल्म सिटी येथे सुरु आहे. तिथे शेकडो फॅन्स त्याची वाट पाहत असतात. वेळ काढून त्या सर्वांना तो भेटतो. त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर त्याच्या सेटवर जातो.

त्यानंतर तिथे गेल्यावर कॉस्ट्यूम सिलेक्शन होत. आज काय घडणार याची दिग्दर्शकासोबत चर्चा होते. 'पुष्पा'चे डिरेक्टर सुकुमार यांच्यासोबत गेली २० वर्ष काम करत आहे. अल्लू अर्जुनने सुकुमार यांच्या पहिल्या चित्रपटात काम केले होते. तेव्हापासून ते दोघे एकत्र काम करत आहेत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

Maharashtra Live News Update: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या चांदीच्या मूर्तीची विधिवत पूजा संपन्न

Travel Insurance: रेल्वे प्रवाशांनो लक्ष असू द्या! फक्त ४५ पैशांत मिळवा १० लाखांचा प्रवास विमा, कसा ते वाचा सविस्तर...

Leopard Attack : बाजारातून परत जाताना बिबट्याचा हल्ला; वृद्ध महिला गंभीर जखमी

Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT