कोरोना नियम धुडकावत आलिया भट्ट दिल्लीत; मुंबईत येताच कारवाई होणार? (पहा Video) Saam Tv
मनोरंजन बातम्या

कोरोना नियम धुडकावत आलिया भट्ट दिल्लीत; मुंबईत येताच कारवाई होणार? (पहा Video)

आलिया एका हाय रिस्क (कोविड 19) संसर्ग असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आली असल्याने BMC ने तिला होम क्वारंटाईन (Home Quarantine) रहाण्याचं बंधन दिलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : हळहळू कोरोनाचे सावट कमी होत होत आहे परंतु असे दिसून येतानाच आता पुन्हा नव्याने कोरोना डोके वर काढणार की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत भर झालेली पाहायला मिळत आहे, बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसून येत आहे. नुकतेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यात आलिया भट्ट (Alia Bhatt) कोरोना नियम झुगारत दिल्लीला (Delhi) गेल्याचे कळत आहे.

निर्माता करण जोहरने (karan johar party) आयोजित केलेल्या पार्टीनंतर करीना कपूरला कोरोनाची लागण झाली असे वृत्त समोर आले. पार्टीतील करीना सह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टी आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. त्यामुळे ती एका हाय रिस्क (कोविड 19) संसर्ग असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे BMC ने तिला होम क्वारंटाईन (Home Quarantine) रहाण्याचं बंधन दिलं होतं.

त्यामुळे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत दिल्लीला गेल्याने अभिनेत्री आलिया भट्टवर मुंबईत (Mumbai) येताच कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण कारण जोहरच्या या पार्टीतील चार बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आलियाची कोरोना चाचणी करण्यात आली होती परंतु तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. होम क्वारंटाइन होण्याचे आदेश असूनसुद्धा ती दिल्लीला गेल्यामुळे आलियावर कारवाईची शक्यता आहे.

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने करणने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. करण जोहरसह या पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांची कोविड 19 चाचणी करण्यात आली होती. (Alia bhatt marathi news)

दरम्यान, दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत आलिया दिल्लीला गेली. त्यावेळेस दिल्लीतील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्याचा फोटोसुद्धा आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अयानच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात आलिया आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT