Alia Bhatt Teaching Telugu To Gal Gadot Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Teached Telugu: ‘अंद्रिकी नमस्कारम...’; आलिया शिकवतेय हॉलिवूड सेलिब्रिटींना तेलुगू भाषा

Alia Bhatt Teaching Video: व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया भट्ट हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅडोटला तेलुगू भाषा शिकवताना दिसत आहे.

Chetan Bodke

Alia Bhatt Teaching Telugu To Gal Gadot: सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा नंतर आलिया भट्ट देखील हॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ११ ऑगस्टला अभिनेत्रीचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान अभिनेत्रीचा सोशल मीडियावर प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅडोटला तेलुगू भाषा शिकवताना दिसत आहे.

प्रमोशन दरम्यानच्या व्हायरल व्हिडीओत आलिया हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅडोट आणि अभिनेता जेमी डॉर्ननला तेलगू शिकवताना दिसत आहे. आलियाने ‘RRR’ चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे तिला काही प्रमाणात तेलुगू भाषा येते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आलिया गॅल गॅडोटला तेलुगू भाषा शिकवताना म्हणते, ‘अंद्रिकी नमस्कारम, मीकूना मुद्दुल्लू.’ म्हणजे ‘सर्वांना माझा नमस्कार आणि प्रेम’ असं त्याचा अर्थ होतो. सध्या आलियाचा हा तेलुगू भाषा शिकवतानाचा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे.

‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटात आलिया भट्टसोबत हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोट आणि हॉलिवूड अभिनेता जेमी डॉर्नन हे चेहरे देखील झळकणार आहेत. चित्रपटात आलियाने खलनायिकेचे पात्र साकारले असून तिने गॅल गॅडोटच्या गुप्तहेराचे पात्र साकारले. यामध्ये आलिया दिलेले मिशन पूर्ण करताना तिला कशा अडचणींचा सामना करावा लागतो, हे दिसणार आहे.

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित या चित्रपटाची प्रेक्षक फारच आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता हा चित्रपट प्रदर्शनाकरिता सज्ज झाला आहे. या चित्रपटाची शूटिंग अभिनेत्रीने प्रेग्नेंसी दरम्यान केली असून तिचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट आहे. सोबतच आलियाने ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’या चित्रपटाची शूटिंग देखील प्रेग्नेंसीच्या काळातच पूर्ण केली होती. आलियाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट येत्या ११ ऑगस्टला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचे तर, नुकतीच आलिया ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात प्रेक्षकांसमोर झळकली होती. तिच्यासोबत या चित्रपटात रणवीर सिंह देखील आहे. अभिनेत्रीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत १०० कोटींचा पल्ला गाठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT