Akshaye Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshaye Khanna: अक्षय खन्नाने मुंबईच्या पॉश भागात घेतला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

Akshaye Khanna: अभिनेता अक्षय खन्नाने मुंबईतील मलबार हिलमध्ये ३३.२६ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. प्रॉपर्टीसोबत तीन पार्किंग युनिट्सचाही समावेश आहे.

Shruti Vilas Kadam

Akshaye Khanna: अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्यांच्या नव्या प्रॉपर्टीमुळे चर्चेत आले आहेत. रिपोर्टनुसार, अभिनेत्याने मुंबईतील प्रसिद्ध मलबार हिल परिसरात तब्बल ३३.२६ कोटी रुपयांना आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांच्या आधारे हा व्यवहार सप्टेंबर २०२६ मध्ये नोंदवला गेल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार, अक्षय खन्नाने खरेदी केलेली ही मालमत्ता ३० लिटल गिब्स, मलबार हिल रोड, मुंबई येथे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्रफळ २,३४१.३९ चौरस फूट म्हणजेच सुमारे २१७.५२ चौरस मीटर आहे.

अपार्टमेंटमध्ये तीन पार्किंग युनिट्स

या अपार्टमेंटसोबत १७५.४५ चौरस फूट बाल्कनी क्षेत्रफळ आहे. त्यामुळे एकूण क्षेत्रफळ २,५१६.८४ चौरस फूट इतके होते. या मालमत्तेसोबत तीन पार्किंग युनिट्सचा समावेश असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारासाठी अभिनेत्याने सुमारे १.९९ कोटी रुपये स्टांप ड्यूटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्यवहाराबाबत संबंधित अभिनेत्याकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

‘महाकाली’मध्ये दिसणार अक्षय खन्ना

दरम्यान, अक्षय खन्ना त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळेही चर्चेत आहेत. प्रशांत वर्मा यांच्या ‘महाकाली’ या चित्रपटात तो शुक्राचार्य यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेतील त्याचा लूक सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे, ‘दृश्यम २’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर अक्षय खन्ना ‘दृश्यम: द कन्क्लूजन’मधून बाहेर पडले असून त्यांच्या जागी जयदीप अहलावत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT