Akshaye Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshaye Khanna: शुक्राचार्यांच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा रौद्र अवतार; ‘महाकाली’चा फर्स्ट लूक रिलीज

Akshaye Khanna: अक्षय खन्नाचा ‘महाकाली’ चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित या सिनेमात तो शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार असून भूमी शेट्टी महाकाली साकारणार आहे.

Shruti Vilas Kadam

Akshaye Khanna: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना लवकरच एका दमदार पौराणिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘महाकाली’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला लूक आणि टीझर समोर आला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना असुरांचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘महाकाली’च्या टीझरमध्ये अक्षय खन्नाचा लूक पाहायला मिळतो. त्याच्या हा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

टीझरमध्ये काय दाखवलं?

‘महाकाली’च्या टीझरची सुरुवात एका लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजाने होते. त्यानंतर अक्षय खन्नाचा आवाज ऐकू येतो. शुक्राचार्यांच्या भूमिकेत तो देव आणि असुर यांच्यातील भेदभावावर प्रश्न उपस्थित करताना दिसतो. समुद्रमंथनात देव आणि असुरांचे समान योगदान असतानाही अमृत केवळ देवांना मिळाले, इंद्राच्या सिंहासनावर असुरांचा अधिकार नाकारण्यात आला आणि संपूर्ण असुर कुळाला पाताळलोकात पाठवण्यात आले, असे प्रश्न शुक्राचार्य उपस्थित करतात. ‘हा धर्म आहे की अधर्म?’ असा सवाल करत तो असुरांच्या विजयाची घोषणा करताना दिसतो. यानंतर अक्षय खन्नाचा दमदार लूक समोर येतो.

श्रिया रेड्डी साकारणार महाकाली

टीझरच्या अखेरीस महाकालीचीही झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रिया रेड्डी ही महाकालीची भूमिका साकारत आहे. भूमीने यापूर्वी कन्नड आणि तेलुगू टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस कन्नड’मध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

८ जानेवारी २०२७ रोजी होणार रिलीज

‘महाकाली’ हा चित्रपट ८ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी गोविंदाचा मुलगा यशवर्धनच्या पदार्पणाचा ‘हिरो की हिरोइन’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT