Hera Pheri  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hera Pheri 3: कॉमेडीचं त्रिकुट खळखळून हसवायला येतंय, 'हेरा फेरी ३'चे शूटिंग सुरु, प्रोमो लवकरच

कालपासून सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नुकताच चित्रपटाच्या प्रोमोचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

Chetan Bodke

Hera Pheri 3 Promo: हेरा फेरीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3) च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरीच्या तिसऱ्या भागामध्ये अक्षय कुमार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कालपासून सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून यात राजू ही भूमिका अक्षय कुमारच साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच चित्रपटाच्या प्रोमोचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, 'हेरा फेरी 3'च्या स्क्रिप्टवर अद्याप काम सुरू असून चित्रपटाचे शूट नंतर सुरू होईल. अक्षय, सुनील आणि परेश रावल लवकरच एक नवा प्रोमो व्हिडीओ शूट करणार आहेत. हा चित्रपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल हे कलाकार एकत्र दिसणार आहेत.

गेल्या काही दिवसांपुर्वी चित्रपटात अक्षयच्या ऐवजी कार्तिक आर्यन दिसणार होता, पण शेवटी अक्षय चित्रपटात परतण्यासाठी तयार झाल्याने कालपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 'हेरा फेरी'चे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. तर 'फिर हेरा फेरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत नीरज व्होरा यांनी केले होते. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Benefits: जर तुम्ही दररोज ३० मिनिटे इंटरवल वॉकिंग केले तर काय होईल?

Politics : शिंदेंची ताकद वाढली, भाजप नेत्याच्या पुतण्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश; थंड महाबळेश्वरचं वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: भरधाव कारने चार ते पाच मोटारसायकल ना दिली धडक

Medu Vada Recipe : संडे स्पेशल नाश्ता; पीठ न आंबवता सकाळी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत मेदू वडा

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; बीडमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT