Akshay Kumar News Saam tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: स्त्री २ नंतर अक्षय कुमार दिसणार आणखी एका हॉरर चित्रपटात; फस्ट लूकने वाढवली उत्सुकता

Akshay Kumar: अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया साईटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. नेमकं हा व्हिडिओ कसला आहे, याचा उलगडा तो त्यांच्या वाढदिवशी करणार आहे.

Bharat Jadhav

या वर्षात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे तीन चित्रपट रिलीज झालेत. परंतु या तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल करू शकल्या नाहीत. दरम्यान अक्षय कुमार स्त्री या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले. अक्षय कुमार या चित्रपटात पाहुणा कलाकाराची भूमिका केली असली तरी त्याच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

स्त्री २ चित्रपटाच्या अखेरीस अक्षय कुमार रुद्र राक्षसी रुपता दिसतो. चित्रपटातील हा शेवट अनेकांना थक्क करणारा आणि पुढे काय होणार याच्या उत्कंठा वाढवणारा ठरला. त्यात अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर कला होता. अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु खुद्द खिलाडी अक्षय कुमारनेही त्याचा उलगडा केला नाहीये.

दरम्यान अक्षय कुमार प्रियदर्शन यांच्या हॉरर चित्रपटात कमा करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यात अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ याच चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने गणपती बाप्पा मोरया आजच्या दिवसापेक्षा भारी क्षण कोणताच असून शकत नाही. हे काय आहे, याचा खुलासा माझ्या वाढदिवशी होईल. दरम्यान अक्षय कुमारचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी आहे. अक्षय कुमार हा ५७ वर्षाचा झालाय.

अक्षय कुमारच्या या मोशन व्हिडिओवर त्याचे चाहत्यांनी रिअॅक्शन दिलीय. प्रतिक्रिया देताना एक चाहता म्हणाला की, यासाठी चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. यासाठी मी वाट पाहू शकत नाही. तर तिसऱ्या चाहत्याने म्हटलं की, अक्की आणि प्रियदर्शन यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट १४ वर्षानंतर लोड होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT