Sky Force Worldwide Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sky Force Worldwide Collection : बॉलिवूडच्या खिलाडीचा जगभरात धुमाकूळ, 'स्काय फोर्स'नं आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी

Sky Force Box Office Collection Day 4 : 'स्काय फोर्स' रिलीज होऊन आता चार दिवस झाले आहेत. बॉलिवूडच्या खिलाडीचा नवीन वर्षातील हा पहिला चित्रपट आहे. अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' (Sky Force) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता चार दिवस झाले आहे. 'स्काय फोर्स' 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने चार दिवसात बंपर कमाई केली आहे. अक्षय कुमारने (Akshay Kumar) धमाक्यात नवीन वर्षाची सुरूवात केली आहे. 'स्काय फोर्स'ने आतापर्यंत जगभरात किती कोटींची कमाई केली जाणून घ्या.

'स्काय फोर्स'ने जगभरात किती कमावले?

'स्काय फोर्स' चित्रपटाने देशांतर्गत 68.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात 81 कोटी रुपये कमावले आहे. मात्र मॅडॉकच्या रिपोर्टनुसार, 'स्काय फोर्स'चित्रपटाने देशांतर्गत 70 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर जगात 92.90 कोटी रुपये कमावले आहे.

'स्काय फोर्स' 4 दिवसांचे कलेक्शन

  • पहिला दिवस- 15.30 कोटी

  • दुसरा दिवस- 26.30 कोटी

  • तिसरा दिवस- 31.60 कोटी

  • चौथा दिवस – 8.10 कोटी

अक्षय कुमारसोबत 'स्काय फोर्स'मध्ये वीर पहारिया (Veer Pahariya) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. अक्षय आणि वीरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.'स्काय फोर्स' हा चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटातून वीर पहारिया याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.

'स्काय फोर्स' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमी देशभक्ती आहे. भारत-पाकिस्तान हल्ल्याची कथा यात सांगण्यात आली आहे. अक्षय कुमार आणि वीरसोबतच या चित्रपटात सारा अली खान, निम्रत कौर हे कलाकारही पाहायला मिळत आहेत. स्काय फोर्सची कथा 1965 झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT