Akshay Kumar VS Vicky Kaushal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar VS Vicky Kaushal Movie: अक्षयच्या 'सरफिरा'साठी 'बॅड न्यूज'... खिलाडीवर भारी पडतोय विकी कौशल

Akshay Kumar VS Vicky Kaushal Movie Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. अक्षय कुमारचा सरफिरा आणि विकी कौशलचा बॅड न्यूज चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. परंतु विकी कौशलचा बॅड न्यूज चित्रपटाने सरफिरा चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे.

Abhilash Patel

बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार विरुध्द विकी कौशल असा सामना पाहायला मिळत आहे. अक्षयच्या 'सरफिरा' या सिनेमापुढे विकीचा 'बॅड न्यूज' हा सिनेमा भारी पडतोय. बॅड न्यूजच्या पाचव्या दिवसाचे कलेक्शन हे सरफिराच्या बाराव्या दिवसाच्या दिवशीच्या कलेक्शनपेक्षाही जास्त आहे.

विकी कौशलचा सिनेमा बॅड न्यूज, 19 जुलैला रिलीज झाला. तर दुसरीकडे त्याआधी म्हणजेच 12 जुलैला प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या सरफिरानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केल्याचे दिसत नाही. विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या सिनेमाने अजूनपर्यंत वर्ल्डवाईड 60 कोटींची कमाई केली आहे. तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने 3.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतात बॉक्स ऑफिसवर बॅड न्यूजने 36.95 कोटी आपल्या खिशात घातले आहेत.

'बॅड न्यूज'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस- 8.03 कोटी

दुसरा दिवस- 10.25 कोटी

तिसरा दिवस- 11.15 कोटी

चौथा दिवस- 3.05 कोटी

पाचवा दिवस- 3.75 कोटी

बॉलिवूडच्या खिलाडीचा सरफिरा सिनेमाने पहिल्याच दिवशी 2.5 कोटींचा बिझनेस केला. विकेंडला शनिवारी 4.25 तर रविवारी 5.25ची कमाई केली. मात्र त्यानंतर सरफिराच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली. सोमवारी सिनेमाने फक्त 1.45 कोटींचा गल्ला जमवला. तसेच आता रोजची कमाई काही लाखांच्या घरात आहे. बाराव्या दिवशी 35 लाख जमवत सिनेमाच्या कमाईमध्ये घसरण नोंदवली गेली. 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा सरफिरा सिनेमा आतापर्यंत फक्त 21 कोटींच्या पुढे गेलेला नाही. त्यामुळे आता बॅड न्यूजसाठी बॉक्स ऑफिसवर सध्या गुड न्यूज असल्याचेच चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹६५०००; HRA आणि महागाई भत्त्यात वाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

धक्कादायक! नागपूरमध्ये तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं, ४ किमी फरफटत नेलं

Dalimb Benefits : उन्हाळ्यात रोज सुपरफ्रूट डाळिंब खल्ल्याने होतात हे ७ आरोग्यवर्धक फायदे

SCROLL FOR NEXT