Akshay Kumar Help Sunny Deol Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Bungalow Auction : सनी देओलच्या मदतीन धावून आला 'खिलाडी'; अक्षय कुमार म्हणाला...

Akshay Kumar Help Sunny Deol: अक्षय कुमारने सनी देओल कर्ज फेडले आहे.

Pooja Dange

Akshay Kumar Helped Sunny Deol To Clear Loan:

सनी देओल सध्या त्याच्या 'गदर २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'गदर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन करत असून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटाचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. चित्रपटाने अवघ्या ९ दिवसात ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.

एकीकडे चित्रपट हिट होत असल्याचा आनंद आहे तर दुसरीकडे सनी देओलच्या घराच्या लिलावाच्या बातम्या येत आहेत. बँक बडोदाने सनी देओल जुहू येथील बंगल्याच्या लिलाव होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. सनी देओलला बँकेकडून घेतलेले ५६ कोटींचे कर्ज फेडतात आलेले नाही.

सनी देओल बंगल्याच्या लिलावाची बातमी चर्चा झाल्यानंतर २४ तासात बँकेने या निर्णयाला स्थगिती दिली. दरम्यान न्युज १८ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार अक्षय कुमारने सनी देओल कर्ज फेडले आहे. यामुळे सर्वत्र अक्षय कुमारचे कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान अक्षय कुमारने यावर प्रतिक्रया दिली असल्याचे देखील न्युज १८ने त्यांच्या बातमीमध्ये लिहिले आहे. अकहस्य कुमार यावर मौन सोडतया सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच अक्षय कुमारने सांगितले की त्यांनी सनी देओलला कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही.

११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमार आणि सनी देओल यांचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. अक्षय कुमारचा 'ओएमजी २' हा त्याच्या 'ओमजी'चा सिक्वेल आहे. तर 'गदर २' हा गदरचा सिक्वेल आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिस यशस्वी ठरले आहेत.

'गदर २' लवकरच ४०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर नुकताच 'गदर २' नवीन रेकॉर्ड करत इतिहास रचला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या वीकेंड सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे. 'गदर २'ने पठान, बाहुबली २, केजीएफ २, दंगल अनु संजू या बक्कळ कमाई करणाऱ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

'ओएमजी २' चित्रपटाने नुकताच १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला 'ए' ग्रेड प्रमाणपत्र मिळाल्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाला प्रदर्शनाआधी अनेक वादांना तोंड द्यावे लागले होते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT