Oh My God 2 Release Date Announced Instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Oh My God 2 Poster : आ रहे हैं हम... OMG 2 चित्रपटाचे पोस्टर आलं; अक्षय कुमार लूक पाहून चकित व्हाल

Akshay Kumar OMG 2 Look: अक्षय कुमार हा भगवान शिवाच्या (शंकर) अवतारात दिसणार आहे.

Pooja Dange

Oh My God 2 Release Date Announced : अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा कॉमेडीचा आणि सामाजिक भान असणाऱ्या 'OMG' चित्रपटांने प्रेक्षकांची मन जिंकली होती. हा चित्रपट २०१२ साली रिलीज झाला होता. आता ११ वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरनेच प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा भगवान शिवाच्या (शंकर) अवतारात दिसणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांना दिली आहे. चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (Latest Entertainment News)

अक्षय-यामीचा 'OMG 2' लवकरचं सिनेमागृहात

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावरून चित्रपटाचं पोस्टर शेअर केल आहे. 'आ रहे है हम,आइएगा आप भी. 11th August. सिनेमागृहात. #OMG2' असं कॅप्शन देऊन त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

यामी गौतम या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामीनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहलय की, 'द डेट इज लॉक ! #OMG2 11 ऑगस्ट, 2023 रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. भेटूया!'

'OMG 2' बद्दल जाणून घ्या

'OMG2' हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट लैंगिक शिक्षणाबद्दल भारतात असलेली असाक्षरता या विषयावर आधारीत आहे. दिग्दर्शक अमित राय, निर्माते अश्वीन वर्दे, जीओ स्टुडिओज् निर्मित हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

चित्रपटाच्या शुटींगची सुरवात ऑक्टोबर २०२१ मध्येच चालू झाली होती. याआधी अक्षय कुमारने चित्रपटाचे पहिला पोस्टर शेअर केले होते आणि लिहलेलं की, 'करता करे न कर शिव करे सो होय.

OMG2 साठी तुमच्या आशिर्वादाची गरज आहे, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की सामाजिक प्रोब्लेमवर भाष्य करणारा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. हर हर महादेव.' पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांना टॅग केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT