Akanksha Chamola Saam tv
मनोरंजन बातम्या

Akanksha Chamola: 'मी बायसेक्शुअल होते, मुलींसोबत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Akanksha Chamola: 'लॉक अप सीझन २'मध्ये सहभागी झालेल्या आकांक्षा चमोलाने तिच्या लैंगिक ओळखीबाबत खुलासा केला. यानंतर ती भावूक झाली आणि सहस्पर्धक श्रेया कालरावर संताप व्यक्त केला.

Shruti Vilas Kadam

Akanksha Chamola: 'अनुपमा' फेम बिग बॉस विजेता अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या 'लॉक अप सीझन २' या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये आल्यापासून ती सातत्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करत आहे. यापूर्वी तिने गौरव खन्नासोबत डिव्होर्स होणार असल्याचे आणि गेल्या वर्षभरापासून ते दोघे वेगळे राहत असल्याचे सांगितले होते. आता तिने तिच्याबद्दल आणखी मोठा खुलासा केला आहे.

शोच्या अलीकडील भागात स्पर्धक श्रेया कालराने आकांक्षाच्या खासगी आयुष्याशी संबंधित माहिती शोमधील आणखी एक स्पर्धक सुफी हिच्यासमोर उघड केली. तिने सांगितले की आकांक्षा बायसेक्शुअल आहे. यानंतर सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख यांनी आकांक्षाला हा व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आकांक्षा भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.

यानंतर आकांक्षाने स्वतः मोठा खुलासा करत म्हणाली, "लग्नापूर्वी मी बायसेक्शुअल होते. माझे काही मुलींसोबत संबंध होते. ते फार शारीरिक किंवा जिव्हाळ्याचे नव्हते, पण मी काही महिलांच्या संपर्कात होते." आकांक्षाने पुढे सांगितले की, तिला स्त्रियांच्या सहवासात सुरक्षित वाटते. "मला मुली आवडतात, त्यांचा आदर करते आणि त्यांच्याकडे आकर्षितही होते. माझ्यासाठी त्यांच्यासोबत असल्याने मला सुरक्षित वाटते. लोक त्याला 'बायसेक्शुअल' म्हणतात, पण माझ्यासाठी ते फक्त खरं प्रेम आहे," असेही तिने स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणानंतर आकांक्षा एलिमिनेशनमधून बचावली. शोमध्ये परतल्यानंतर तिने श्रेया कालरावर नाराजी व्यक्त केली. आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित माहिती चोरून ऐकून तिसऱ्याचं व्यक्तीला सांगितल्यामुळे आकांक्षाने श्रेयाला सुनावले. "तुझ्यापेक्षा वाईट, निर्दयी आणि असंवेदनशील व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाही. या शोमध्ये किंवा बाहेर कुठेही या मुलीवर विश्वास ठेवू नका'' असे तिने शोच्या सर्व स्पर्धकांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली

पावसाळ्यात डोकं ठणकत असेल तर घरीच करा सोपा उपाय, अवघ्या १० मिनिटांत मिळेल आराम

Vande Bharat : मुंबई अहमदाबाद प्रवास फक्त १ तासात, २०२७ ला सुरु होणार पहिला टप्पा; जाणून घ्या A to Z माहिती

Monsoon Healthcare Tips : पावसाळ्यात साथींच्या आजारांपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

Skin Care: महागड्या स्किनकेअरशिवाय मिळवा गुलाबी ग्लो; फक्त रोज सकाळी प्या 'हा' हेल्दी ज्यूस

SCROLL FOR NEXT