Bhavin Bhanushali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhavin Bhanushali : अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलाचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Bhavin Bhanushali Engagement Photos : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भाविन भानुशाली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भाविन भानुशाली (Bhavin Bhanushali) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. भाविन भानुशालीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने शून्यातून आपले करिअर उभे केले आहे. भाविन स्प्लिट्सव्हिलामध्ये ही पाहायला मिळाला होता. त्याने अनेक गुजराती, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत देखील भाविनने काम केले आहे. अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटात अजयच्या मुलाची भूमिका साकारली होती.

भाविनने इंस्टाग्रामवर रोक्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून , त्याच्या इन्फ्लुएन्सर मित्रांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्याने या फोटोंना खूप छान कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, 'रॉकफेड आणि आनंदी'

रोक्यासाठी दोघेही पेस्टल कलरमध्ये रंगून गेले आहेत. भाविनने पेस्टल ऑरेंज रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर त्याच्या होणाऱ्या बायकोने पेस्टल पिंक आणि केशरी रंगाची साडी नेसली आहे. दोघांनीही पारंपारिक लूक केला आहे.दोघही एकमेकांसोबत रोमँटिक पोज दिली आहे. दोघ एकत्र खूप छान आणि आनंदी दिसत आहेत. फोटोंमधून त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापही भाविनने त्याच्या होणाऱ्या बायकोचे नाव सांगितले नाही आहे. त्यामुळे चाहत्यांना कोण आहे भाविन भानुशालीची बायको हे जाणून घेण्यास उत्सुकता लागली आहे.

भाविन भानुशाली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक चित्रपटात आणि म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. Teen Tigada म्हणून भाविन भानुशालीचे त्याच्या मित्रांसोबत युट्युब चॅनेल आहे. यात तो आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस फेम विशाल पांडे, समीक्षा सुद हे तिघे एकत्र होते. या तिघांची छान मैत्री आहे. अनेक वेळा चाहत्यांना समीक्षाच भाविनची गर्लफ्रेंड वाटली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO उतरणार मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT