Drishyam 3 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

Drishyam 3 Box Office Collection Day 4 : 'दृश्यम ३'ने चार दिवसांत ३०० कोटी कमावले आहे. अजय देवगणचा चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

अजय देवगणचा 'दृश्यम 3' चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज

४ दिवसांत 'दृश्यम 3'ने कमावले ३०० कोटी पार

'दृश्यम 3' मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट

'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने अवघ्या ४ दिवसांत थिएटर गाजवले आहे. अजय देवगणची क्रेझ वाढताना दिसत आहे. 'दृश्यम ३' हा मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज झाला. 'दृश्यम ३' मध्ये अजय देवगण, जयदीप अहलावत, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'दृश्यम ३' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'दृश्यम ३'ची चार दिवसांत जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन कलेक्शनने ३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी ६२ कोटी रुपयांच्या कमाईसह सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी अंदाजे ५३.५० कोटी रुपये कमावले आणि रविवारी कमाईचा वेग वाढवत ६१ कोटी रुपये मिळवले. सोमवारच्या २१ कोटी रुपयांच्या कमाईमुळे भारतातील चार दिवसांची एकूण नेट कमाई १९७.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. परदेशातील बाजारपेठेतून ५ कोटी रुपयांची भर पडली, ज्यामुळे चित्रपटाची परदेशातील एकूण ग्रॉस कमाई ६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'दृश्यम ३' चित्रपटाची भारतातील निव्वळ कमाई १९७.५० कोटी रुपये झाली आहे. सध्या त्याची भारतातील एकूण ग्रॉस कमाई २३७ कोटी रुपये इतकी आहे. भारत आणि परदेशातील आकडेवारी एकत्रित केल्यास, 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने जगभरात एकूण ३०३ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. चित्रपट लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे सह-लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती 'पॅनोरामा स्टुडिओज' आणि 'स्टार स्टुडिओ १८' यांनी केली आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम'चा हा तिसरा भाग आहे. पहिले दोन भाग खूप गाजले. आता तिसरा भाग पुन्हा धुमाकूळ घालायला येत आहे. 2015 ला 'दृश्यम' आणि 2022 ला 'दृश्यम 2' रिलीज झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

SCROLL FOR NEXT