Drishyam 3  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Drishyam 3 : झुकेगा नहीं साला! 'दृश्यम ३'चा दबदबा; अजय देवगणने रचला इतिहास, कमाईचा आकडा वाचून व्हाल चकित

Drishyam 3 Box Office Collection Day 5 : 'दृश्यम ३' ने पाच दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

Shreya Maskar

'दृश्यम ३' चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज

'दृश्यम ३' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 'ओपनिंग' करणारा चित्रपट

'दृश्यम ३' लवकरच 'दृश्यम २' चा रेकॉर्ड ब्रेक करणार

'दृश्यम ३' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला आहे. सलग पाच दिवस चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम ३' चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी थिएटर गाजवत आहे. 'दृश्यम ३' चित्रपट आता या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. या चित्रपटाने अजय देवगणला संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम 'ओपनिंग डे' मिळवून दिला आहे.

'दृश्यम ३' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'दृश्यम ३'ने भारतात पहिल्या पाच दिवसांत २१६.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६२ कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने जोरदार सुरुवात केली. शनिवारी कमाईत थोडी घट होऊन ती ५३.५० कोटी रुपयांवर आली, परंतु रविवारी पुन्हा ६१ कोटी रुपयांची कमाई झाली. सोमवारी चित्रपटाने २१ कोटी रुपये कमावले. 'दृश्यम ३' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी १९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

'दृश्यम ३'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

मीडिया रिपोर्टनुसार, 'दृश्यम ३'ने मूळ 'दृश्यम' चित्रपटाच्या संपूर्ण थिएटरमधील कमाईपेक्षा (१०२.७५ कोटी रुपये ) दुप्पट कमाई आधीच केली आहे. तर हा चित्रपट आता 'दृश्यम २' च्या कमाईच्या आकड्याच्या खूप जवळ पोहोचला आहे. 'दृश्यम २' ची भारतातील एकूण नेट कमाई २३९.६७ कोटी रुपये होती. 'दृश्यम ३' आता ३० कोटी रुपयांनी मागे आहे. येणाऱ्या वीकेंडला 'दृश्यम ३' हा आकडा पार करून फ्रँचायझीमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो, असे चित्रपट दिसत आहे.

अजय देवगणने रचला इतिहास

'दृश्यम ३' ने पहिल्या दिवशी ६२ कोटी रुपयांची नेट कमाई केली, जी 'सिंघम अगेन'च्या ( ४३.५० कोटी रुपये ) तुलनेत बरीच जास्त आहे. 'दृश्यम ३' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 'ओपनिंग' करणारा ठरला आहे. 'दृश्यम ३'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. चित्रपटात अजय देवगण, जयदीप अहलावत, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव कलाकार झळकले. 2015 ला 'दृश्यम' आणि 2022 ला 'दृश्यम 2' रिलीज झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर इर्टीगा कारला अपघात

Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Gaya Janardhan Temple: भारतातील एक असं मंदिर जिथे लोकं करतात स्वतःचं पिंडदान; काय आहे धार्मिक मान्यता?

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण, प्रति तोळा किंमत किती? पाहा अपडेट

Neem leaves benefits: सकाळी सकाळी उपाशी पोटी चावून खा कडुलिंबाचं 1 पान; मिळतील आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT