Aishwarya Rai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ऐश्वर्याने एआयचा वापर करुन तिचे फोटो गैर प्रकारे वापर थांबवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

Shruti Vilas Kadam

Aishwarya Rai: प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. बच्चन कुटुंबाची सून तिच्या मुलीच्या संगोपनाकडे पूर्ण लक्ष देत आहे. दरम्यान, ऐश्वर्याने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करावे आणि काही लोकांना तिचे नाव, फोटो आणि एआय जनरेटेड पोर्नोग्राफिक कंटेंट वापरण्यापासून रोखावे अशी विनंती केली आहे.

ऐश्वर्या म्हणते की तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जात आहेत. अभिनेत्रीने न्यायालयाकडे तिच्या वैयक्तिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. ऐश्वर्या तिच्या अर्जात म्हटले की, 'एआयचा वापर करुन, मग आणि इतर वस्तू विकण्यात येतात. तसेच, स्क्रीनशॉटमधील चित्रांमध्ये छेडछाड करुन त्याता गैर वापर केला जातो

एआय जनरेटेड फोटोंच्या माध्यमातून पैसे कमवणे

ऐश्वर्या राय यांच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील संदीप सेठी म्हणाले की, अभिनेत्री तिच्या प्रसिद्धी आणि वैयक्तिक अधिकारांची अंमलबजावणी करू इच्छिते आणि काही आक्षेपाहार्य फोटो चित्रे इंटरनेटवर प्रसारित केली जात त्यावर रोख लावण्याचा हा प्रयत्न आहे असा युक्तिवाद केला. संदीप सेठी म्हणाले, लोक फक्त तिचे नाव आणि चेहरा चुकीच्या पद्धतीने वापरून पैसे कमवत आहेत.

वकिलाने असा युक्तिवाद केला की तिचे मॉर्फ केलेले फोटो काही पोर्नोग्राफिक प्लॅटफॉर्मवर वापरले जात आहेत. हे प्लॅटफॉर्म लैंगिक दृश्यांमध्ये तिच्या नावाचा आणि फोटोंचा गैरवापर करून पैसे कमवत आहेत. वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या एकलपीठाने ७ नोव्हेंबर रोजी संयुक्त रजिस्ट्रारसमोर आणि १५ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयासमोर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT