aishwarya rai bachchan Saam tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला अपघात, बेस्ट बसने दिली धडक

aishwarya rai bachchan car accident : ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला अपघात झालाय. बेस्ट बसने ऐश्वर्या रायच्या कारला धडक दिली.

Vishal Gangurde

Aishwarya rai Car Accident : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या कारचा किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईत बुधवारी सायंकाळच्या सुमारास अपघात झाला आहे. ऐश्वर्याच्या कारला बेस्ट बसने धडक दिली. ऐश्वर्या रायला कोणतीही दुखापत झालेली नाही. ऐश्वर्या रायच्या कारचा मोठा अपघात झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोशल मीडियावरील एका अकाऊंटवरून ऐश्वर्या राय बच्चनच्या कार आणि बसची धडक दिल्याची बातमी समोर आली. ऐश्वर्या रायच्या अपघाताच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, ऐश्वर्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांनी चिंता करण्याची गरज नाही. बेस्ट बसने ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला धडक दिली. त्यानंतर तिचे सुरक्षारक्षक तातडीने कारमधून उतरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ऐश्वर्या रायच्या कारला काही झालेलं नाही. तसेच बस चालकाशी सुरक्षारक्षकांनी चर्चा केल्यानंतर ऐश्वर्याची कार पुढे निघाली. ऐश्वर्याच्या कारच्या अपघाताच्या बातमीची चर्चा चाहत्यांमध्ये जोरदार सुरु आहे. दुसरीकडे ऐश्वर्याच्या कारच्या अपघाताची बातमी खोटी असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन ही डायरेक्टर आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्कच्या लग्नात दिसली होती. कोणार्कने त्याची गर्लफ्रेंड नियतीशी लग्न केलं. या लग्नाला संपू्र्ण बच्चन कुटुंब पोहोचलं होतं. सोशल मीडियावर त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकने स्टेजवर कोणार्क आणि त्याची पत्नी नियतीला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचेही फोटो समोर आले होते.

ऐश्वर्या राय ही अनेक कार्यक्रम आणि फॅशन शोमध्ये स्पॉट होते. ऐश्वर्या सोशल मीडियावर फार सक्रिय नसते. ऐश्वर्या वाढदिवस आणि काही विशेष दिवसाची पोस्ट करते. ऐश्वर्यासहित तिची मुलगी आराध्या बच्चन देखील चाहत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT