Aishwarya Narkar Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar Dance Video: 'तिच्या डोळ्याला गॉगल काळा...' गाण्यावर ऐश्वर्या नारकरचा पतीसोबत जबरदस्त डान्स, video व्हायरल

Aishwarya Narkar Dance On Trending Song: सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर अभिनेत्री ऐश्वर्याने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने पती अविनाश नारकरसोबत डान्स केला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नृत्यामुळे कायमच चर्चेत असते. ट्रेंडिग गाण्यावर हुकस्टेप करत ऐश्वर्या तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या डोळ्याला गॉगल काळा या गाण्याची क्रेझ आहे. अनेकजण या गाण्यावर मजेदार रिल्स बनवत आहेत. अशातच या गाण्यावर आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिने देखील डान्स केला आहे.

सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर अभिनेत्री ऐश्वर्याने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने पती अविनाश नारकरसोबत डान्स केला आहे. मराठमोळ्या अंदाजात ऐश्वर्याने खास पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तर अविनाशने टि-शर्टवर जॅकेट असा लूक केला आहे. या दोघांनीही आपल्या हटके स्टाईलमध्ये गाण्यावर डान्स केला आहे. गाण्याच्या बोल प्रमाण दोघांनीही डोळ्यांना गॉगल लावून स्टेप्स केली आहे.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्सचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे तर अनेकांनी या व्हिडीओ मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नेहमीच सोशल मिडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करतात. ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्सचा खास चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर या दोघांचेही चाहते डान्सवर लाईक्सचा वर्षाव करतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT