Bobby Deol Airport Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Bobby Deol Trolled: ’एक हिट चित्रपट दिला तर डोक्यात हवा गेली का?’; बॉबी देओलचे कृत्य पाहून नेटकरी भडकले

Bobby Deol Viral Video: सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

Chetan Bodke

Bobby Deol Airport Viral Video

संदीप रेड्डी वांगा यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत जगभरामध्ये ७०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. एकही डायलॉग नसतानाही आणि अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेने बॉबी देओलने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सध्या बॉबी देओलचा भाव वधारला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतंच बॉबी देओल दिल्ली विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. यावेळी बॉबी देओलने ब्लॅक प्रिंटेड शर्ट, ब्लॅक पँट आणि ब्लॅक गॉगल असा त्याचा लूक होता. यावेळी जरा घाईमध्ये असल्याचं दिसत आहे. बॉबी घाईमध्ये असताना, त्याच्याकडे एक फॅन सेल्फी घेण्यासाठी आला होता. बॉबी देओल सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला देत पुढे निघून जातो. बॉबीचं हे वागणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. 'बॉलिवूड शादीज' या इन्स्टा पेजने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Trolled)

या व्हिडीओवरुन अनेकांनी बॉबी देओलला प्रचंड ट्रोल केलं आहे. ‘२५ वर्षांच्या सिनेकारकिर्दित एक हिट चित्रपट दिला तर लगेच डोक्यात हवा गेली का?’, ‘पिक्चरचं सक्सेस याच्या डोक्यात गेलं आहे’, ‘नेमकं बॉबीला लॉर्ड का म्हटलं जातंय’ तर आणखी एकाने ‘अजूनही ‘अबरार’च्याच भूमिकेत आहेस का?, रियल लाईफमध्ये ये’ असं म्हणत नेटकरी बॉबी देओलला ट्रोल करीत आहे. (Social Media)

१३ दिवसांत चित्रपटाने वर्ल्डवाईड ७५० कोटींपार कलेक्शन केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत ७७२. ३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकट्या भारतात एकूण ४६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT