Shah Rukh Khan Birthday Special  Saam Tv
मनोरंजन बातम्या

SRK Birthday Post: 'मन्नतपासून शाहरुख खानपर्यंतचे प्रेम, अगणित', किंग खानसाठी चाहत्याची खास पोस्ट

शाहरूखच्या वाढदिवसाआधीच त्याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमू लागले आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शाहरुखच्या बंगल्याबाहेरील चाहत्यांची गर्दी दाखवली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahrukh Khan Birthday: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा सोशल मीडियावर प्रचंड चाहतावर्ग आहे. नेहमीच चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखचा वाढदिवस असतो. शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एका सणापेक्षाही कमी नाही.

त्याचवेळी, शाहरूखच्या वाढदिवसाआधीच त्याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमू लागले आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शाहरुखच्या बंगल्याबाहेरील चाहत्यांची गर्दी दाखवली.

व्हिडिओमध्ये, यावेळी त्याच्या चाहत्यांनी बंगल्याबाहेर एकच गर्दी केली होती. चाहते आपल्या आवडत्या किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या चाहत्याने लिहिले की, 'मन्नतपासून शाहरुख खानपर्यंतचे प्रेम, अगणित.'

किंग खानच्या वाढदिवशी त्याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे, अद्याप तरी चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार याची माहिती मिळाली नाही. शाहरुख खान शेवटचा आनंद एल राय दिग्दर्शित 'झिरो' चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत स्क्रीनवर दिसला होता.

चार वर्षांनंतर तो 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT