Vijay Deverakonda Saam Tv
मनोरंजन बातम्या

मी सिंगल.... विजय देवरकोंडाची सोशल पोस्ट चर्चेत, लवकरच....

'लायगर'च्या अपयशानंतर आता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा गरूडझेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक्टिव्ह नव्हता. अलीकडेच विजय देवरकोंडाचा 'लायगर'(Liger) प्रदर्शित झाला. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. चित्रपटाचा अपेक्षेप्रमाणे प्रभाव पाडू शकला नाही. मात्र चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पंसतीस आली. 'लायगर' सुपरफ्लॉप झाल्या नंतर आता विजय पुन्हा एकदा गरूडझेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

सोशल मीडियावर एक्टिव्ह नसलेल्या अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. विजयने त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर त्याचा बॉसी लूक असलेला फोटो पोस्ट केला आहे. फूल टू ब्लॅक असा रॉयल लूक विजयने केला आहे. 'सिंगल प्लेअर' असे कॅप्शन लिहित विजयने शेअर केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अनेकदा चाहते विजयच्या फोटोंवर प्रेमाचा आणि कौतुकांचा वर्षाव करतात. दरम्यान, काही तासांतच विजय देवरकोंडाच्या या नवीन फोटोंला लाखोंच्या घरात लाईक्स आहेत. तर अनेक नेटकाऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजर्सने 'वाव! खूपच सुदंर' असे लिहले आहे तर आणखी एकाने हार्ट इमोजीसह 'फोटो एकदम झक्कास' अशी कमेंट केली आहे.

पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'लायगर' चित्रपटात विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन मुख्य भूमिकेत दिसले होते. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ६६.८९ कोटींचा गल्ला केला आहे. आगामी काळात विजय साऊथचा चित्रपट 'जन गण मन - JGM' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपटदेखील पुरी जगन्नाथ दिग्दर्शित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

Moisturizer: जास्त मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

SCROLL FOR NEXT