Swati Sachdeva Controversial Joke: आजकाल कॉमेडी शोच्या नावाखाली बरेच अश्लील विनोद करण्यात येत आहेत. अलीकडेच, समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोवरून बराच वाद झाला. रणवीर अल्लाहबादियाने शोमध्ये पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केली होती, त्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आता, रणवीरनंतर, आणखी एका स्टँड-अप कॉमेडियनने शोमध्ये तिच्या आईबद्दल नावाखाली अश्लील कॉमेडी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
'माझी आई एक कूल आई बनण्याचा प्रयत्न करत आहे'
ही स्टँड-अप कॉमेडियन दुसरी कोणी नसून स्वाती सचदेवा आहे. स्वातीचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे, त्यामध्ये ती तिच्या आईबद्दल अश्लील गोष्टी बोलताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये स्वाती म्हणत आहे की, 'माझी आई एक कूल आई बनण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती ते करू शकत नाही.' अलिकडेच स्वातीने आईसोबतच एक प्रसंग सांगितले आणि म्हणाली, तिने माझा व्हायब्रेटर पकडला, ती पूर्ण आत्मविश्वासाने डोलत माझ्याकडे आली आणि म्हणाली, इकडे ये आणि माझ्या शेजारी बस. आरामात बसा, मला तुमच्याशी एका मैत्रिणीसारखे बोलायचे आहे. त्यावर स्वाती पुढे म्हणाली, 'आता ही नक्कीच माझ्याकडून व्हायब्रेटर उधार उधार मागणार वाटत.'
'पालकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे'
ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग शिगेला पोहोचला आहे. नेटकरी स्वातीवर खूप रागावले आहेत. एवढेच नाही तर लोकांनी स्वातीवर कारवाईची मागणी करत आहे. नेटकऱ्यांने लिहिले, 'बेशरम...' काही मर्यादा आहेत की नाही तुमच्या विनोदाच्या...स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी पालकांचा अनादर कास करता तुम्ही?'
आणखी एका संतप्त नेटकऱ्यांने लिहिले 'लज्जास्पद.' विनोद आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली संपूर्ण महिलावर्गाची बदनामी करत आहेत. "घृणास्पद, तिच्या पालकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे," एक लिहितो. एवढेच नाही तर काही नेटकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना टॅग करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.