Shah Rukh Khan Press Conference  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: 'तो आला अन् जिंकून घेतलं सारं...', 'पठान'च्या घवघवीत यशानंतर शाहरुख पहिल्यांदाच भरभरून बोलला

चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अखेर शाहरुख माध्यमांसोबत आला आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: गेल्या अनेक दिवसांपासून 'पठान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची चर्चा सुरु झाल्यापासून शाहरुखने माध्यमांशी संपर्क साधला नव्हता. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अखेर शाहरुख माध्यमांसोबत आला आहे.

शाहरुख माध्यमांसोबत संपर्क साधताना बोलला की, "माझा अखेरचा चित्रपट झिरो होता. त्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊनचाच सामना करावा लागला होता. त्यावेळी मला अनेकदा नेटकरी म्हणाले होते, तुझा आता चित्रपट चालत नसून तु आता अभिनय करण्याचे सोडून नवा बिझनेस सुरु कर."

"तर त्यावेळी मी स्वयंपाक बनवायला शिकलो. हा स्वयंपाक मला चित्रपटाच्या शूटिंगवेळी खरंच खूप कामी आला. चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी सर्वांनाच वेगवेगळे पदार्थ बनवून खायला दिले. मी पिझ्झासोबत अनेक पदार्थ बनवुन सर्वांना खायला घातले."

सोबतच पुढे शाहरुख म्हणतो, "चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, मी आणि दीपिका अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात मला तिच्यासोबत चित्रपटात काम करताना फारच मज्जा आली. जॉनबद्दल बोलायचे झाले तर, मी आणि जॉनने कधीच एकत्र काम केले नव्हते. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची गंमत एक वेगळीच होती."

"जॉन आणि मी अनेक थरारक स्टंट्सचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला त्याच्यासोबत काम करताना खुपच मज्जा आली. चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हा प्रतिसाद मला पुढील काम करण्यासाठी फारच उर्जा देऊन जातो. मी थिएटरमधील अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिल्या. त्या पाहून मला गहिवरुन आले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT