Disha Patani Boyfriend Saam Tv
मनोरंजन बातम्या

Disha Patani Boyfriend: दिशा पटानीच्या आयुष्यात आला नवा 'टायगर'; सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली

Disha Patani News: दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असताना आता दिशाच्या नवीन बॉयफ्रेंडचा चेहरा समोर आला आहे.

Chetan Bodke

Disha Patani Boyfriend: दिशा पटानीची सोशल मीडियावर बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. दिशा पटानी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. दिशा सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

दिशा पटानीचे नाव आल्यावर आपसूकच टायगर श्रॉफचंही नाव आपल्या समोर येते. ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असताना आता दिशाच्या नवीन बॉयफ्रेंडचा चेहरा समोर आला आहे.

दिशा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. एका व्हिडीओमुळे सध्या दिशा बरीच चर्चेत आली आहे. या व्हिडिओत दिशा कथित बॉयफ्रेंड ॲलेक्झांडरसोबत स्पॉट झाली आहे.

नुकताच दिशाचा एका पार्टीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिशा आणि तिचा बॉयफ्रेंड ॲलेक्झांडर दिसत आहे. यात दिशा आपल्या मैत्रिणीला सांगतेय की, 'हा माझा बॉयफ्रेंड आहे.'

या पार्टीला टायगर श्रॉफही उपस्थित होता. परंतु या पार्टीत दिशा आणि टायगरने एकत्र एकही पोझ दिली नाही. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपासून दिशा आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपची माहिती समोर आली होती. या माहितीमुळे चाहत्यांना मात्र मोठा धक्काच बसला होता. दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपमुळे चाहते निराश झाले होते. तर काही वृत्तांनुसार दिशा ही टायगरच्या एकतर्फी प्रेमात होती.

टायगर दिशाला फक्त चांगली मैत्रिण मानत होता.असे बोलले जात आहे. याबाबत टायगरची बहिण आयेशा श्रॉफनेही या सर्व चर्चा खोट्या असल्याचे सांगितले होते.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दिशा पटानी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT